बंगालच्या उपसागरातील कमी दाब क्षेत्राची तीव्रता वाढल्याने राज्यात सर्व दूर पावसाची शक्यता आहे . कोकणात घाटमाथ्यावर पूर्व विदर्भात पावसाचा जोर वाढणार असून रत्नागिरी, रायगड, पुणे, साताऱ्याच्या, घाट माथ्यावर अति जोरदार पावसाचा रेड अलर्ट हवामान विभागाने वर्तवला आहे.
मान्सूनचा आस असलेला कमी दाबाचा पट्टा राजस्थानच्या जैसलमेर ,कोठा, रायपुर, भवानीपट्टण, कमी दाब क्षेत्राची केंद्र ते पूर्व मध्य बंगालच्या उपसागरापर्यंत सक्रिय आहे. मध्य प्रदेश आणि परिसरावर समुद्र सपाटीपासून 3.1 किलोमीटर उंचीवर चक्राकार वारे वाहत आहेत. कोकणघाटमाथ्यावर पावसाच्या जोरदार सरी कोसळत आहे. उर्वरित राज्यातही कमी अधिक प्रमाणात पाऊस सुरू आहे. आज 26 जुलै रत्नागिरी, पुणे ,रायगड, साताऱ्याच्या घाटमाथ्यावर ,अति जोरदार पावसाचा रेड अलर्ट दिला आहे. तसेच कोकण कोल्हापूर, नांदेड, गोंदिया, भंडारा, गडचिरोली ,जिल्ह्यात काही ठिकाणी दमदार पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. उर्वरित राज्यात विजा सह जोरदार पावसाचा यलो अलर्ट हवामान विभागाने वर्तवला आहे.
जोरदार पाऊस विजांसह पावसाचा इशारा येलो अलर्ट
सोलापूर ,जळगाव, नाशिक, नगर ,सांगली, छत्रपती संभाजी नगर, बीड, जालना ,धाराशिव, हिंगोली ,परभणी, लातूर, अकोला, बुलढाणा, वाशिम, अमरावती, नागपूर, यवतमाळ, वर्धा ,चंद्रपूर, हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार आजही राज्यात जोरदार पावसाची शक्यता आहे. यामध्ये कोकणासह मध्य महाराष्ट्र विदर्भ पावसाचा अंदाज वर्तवलेला आहे. कोकणातील रायगड, रत्नागिरी, जिल्ह्यामध्ये पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आलेला आहे. तर सिंधुदुर्ग, कोल्हापूर ,ठाणे, पालघर, मुंबईला पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे. पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, सातारा, जिल्ह्यामध्ये आज रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर गडचिरोली ,गोंदिया, आणि नांदेड जिल्ह्यासह ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलेला आहे. तर मराठवाड्यात आणि विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये उत्तर महाराष्ट्रात पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आलेला आहे.
रत्नागिरी जिल्ह्यात मुसळधार पाऊस
रत्नागिरी जिल्ह्यामध्ये सध्या मुसळधार पाऊस कोसळत आहे. पावसामुळे नदी नाल्याना पूर आले आहेत. काही भागांमध्ये वाहतुकीचा मोठा परिणाम झाला आहे. खेड तालुक्यामध्ये पावसाने चांगला जोर धरला आहे.
मुंबईत पावसामुळे वाहतुकीला अडथळा
मुंबई सह ठाणे परिसरात मुसळधार पाऊस सुरू आहे. या पावसामुळे काही भागात पाणी साचले आहे. त्यामुळे वाहतुकीचा अडथळा निर्माण झालेला आहे. मुंबईच्या अंधेरी सबवे खाली पाणी भरल्यामुळे अंधेरी बंद करण्यात आला आहे. मुंबईच्या पश्चिम उपनगरात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे वाहतुकीवर परिणाम दिसून येत आहे.
पुणे जिल्ह्यात जोरदार पाऊस
पुणे जिल्ह्यातही जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. धरण परिसरात सुरू असलेल्या पावसाने पाणीसाठा वाढला आहे. खडकवासला धरणातून पाण्याचा विसंग मुळा नदीच्या पात्र सुरू करण्यात आलेला आहे.मागील तीन ते चार दिवसापासून धरण क्षेत्रामध्ये पावसाने दमदार हजेरी लावलेली आहे .त्यामुळे पुणे शहराला पाणीपुरवठा करणारी चारी धरणाच्या पाणी पातळीमध्ये चांगलीच वाढ झालेली आहे.
यवतमाळ जिल्ह्यात मोठे नुकसान
यवतमाळ जिल्ह्यामध्ये सतत सुरू असलेल्या पावसामुळे नद्यांना पूर आलेले आहेत. तसेच शेतामधील पीक वाहून गेले आहे. या जिल्ह्यातील इतिहासामधील हा सर्वात भयंकर पाऊस असून सरकारने नुकसान गृहस्थांना तातडीची सानुग्रह दहा हजार रुपयाची मदत जाहीर केलेली आहे.
वाशिम जिल्ह्यातील शेतीला मोठा फटका
वाशिम जिल्ह्यातील मनोरा तालुक्यात मुसळधार पावसाने मोठे नुकसान केले आहे . पावसामुळे जिल्ह्यात 45 हजार 874 हेक्टर वरील पिकाचे नुकसान झाले आहे. यामध्ये कपाशी, तूर ,सोयाबीन, उडीद, मूग, या पिकांचे नुकसान झाले असून पुराचे पाणी गावात शिरले त्यात लोकांचे खूप मोठे नुकसान झालेले आहे.