अर्थ मंत्रालयाने सर्वसामान्यांना मोठी भेट दिली आहे. आता मोबाईल फोन ,टीव्ही ,फ्रीज ,तसेच घरगुती वस्तू स्वस्त होणार आहेत .अर्थमंत्रालयाने अनेक इलेक्ट्रॉनिक वस्तूंवरील जीएसटी दरात मोठी कपात केली आहे .
अर्थ मंत्रालयाने अशा वस्तूंची संपूर्ण यादी जाहीर केली आहे. पंखे ,कुलर ,गिझर ,इत्यादींवरील जीएसटी 31.3% वरून 18% करण्यात आला आहे.
जीएसटी मध्ये मोठी कपात
एलईडी बल्ब ,मोबाईल फोन ,टीव्ही, फ्रिज, घरगुती उपकरणावरील जीएसटी मध्ये मोठी कपात करण्यात आली आहे. मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार मोबाईल फोन ,एलईडी बल्ब ,स्मार्ट टीव्ही, वॉशिंग मशीन, यूपीएस ,फ्रीज यावरील जीएसटी 31.3 टक्क्यावरून 12 टक्के करण्यात आलेला आहे .अर्थ मंत्रालयाने ट्वीट करून या संदर्भात माहिती दिली आहे.
27 इंच किंवा त्यापेक्षा कमी आकाराच्या टीव्ही स्वस्त
जीएसटीच्या नव्या दरानुसार जर तुम्ही 27 इंच किंवा त्यापेक्षा कमी आकाराची टीव्ही खरेदी करत असाल. तर तुम्हाला पूर्वीपेक्षा कमी पैसे द्यावे लागतील .तसेच बहुतेक कंपन्या किमान 32 इंच किंवा त्याहून अधिक आकाराचे टीव्ही तयार करतात. 32 इंच किंवा त्याहून अधिक आकाराच्या टीव्हीवर कोणताही बदल करण्यात आलेला नाही पूर्वीप्रमाणेच त्यांच्यावर ३१.३ टक्के जीएसटी लागू राहणार आहे.
मोबाईल फोनच्या किमतीतही घट
अर्थ मंत्रालयाने मोबाईलवर आकारण्यात येणारे जीएसटी मध्ये घट केली असून यापूर्वी मोबाईलवर 31.3% जीएसटी आकारला जात होता परंतु आता तो जीएसटी 12 टक्के करण्यात आला आहे. म्हणजेच आता तुम्ही नवा मोबाईल खरेदी केला तर तुम्हाला केवळ बारा टक्के जीएसटी द्यावा लागणार आहे. अर्थ मंत्रालयाने जीएसटी वरील किमतीत घट केल्यामुळे मोबाईल उत्पादक कंपन्या मोबाईलच्या किमती कमी करू शकतात. एकंदरीत येत्या सणासुदीच्या काळात मोबाईल फोन खरेदी केल्यास पैसे कमी मोजावे लागतील.