टोमॅटोच्या दरात वाढ होण्याची नेमकी कारणं काय? 

टोमॅटोच्या दरात वाढ होण्याची नेमकी कारणं काय

देशात टोमॅटोच्या दरामध्ये वाढ झाली असून . टोमॅटोचा दर 100 ते 120 रुपये किलो वर पोहचला आहे. तर काही ठिकाणी 80 ते 90 रुपये किलो पर्यंत टोमॅटोचा दर आहे .ज्या शेतकऱ्यांकडे सध्या टोमॅटोची पीक आहे. त्यांना या वाढत्या दराचा चांगलाच फायदा होत आहे. टोमॅटोच्या दरात वाढ होण्यामागचे नेमके कारण काय?

दर वाढण्यासाठी नेमकी कारणे काय

टोमॅटोचे दर वाढण्याची अनेक कारणे आहेत. पहिले कारण म्हणजे तापमानात झालेली वाढ अनेक राज्यांमध्ये गेल्या काही दिवसात कडक  ऊन होते. या उन्हामुळे टोमॅटो पिकाचे नुकसान झाले आहे. त्यामुळे याचा परिणाम दरावर झाला आहे .दुसरे कारण म्हणजे टोमॅटोचे कमी उत्पादन टोमॅटोचे उत्पादन कमी आणि वाढती मागणी याचा परिणाम देखील दर वाढण्यावर झाला आहे. त्याचबरोबर देशात पावसाचे आगमन हे उशिरा झाले आहे .त्यामुळे देखील टोमॅटोचे भाव वाढले आहेत.

पावसामुळे टोमॅटो पिकाचे मोठे नुकसान

उत्तर प्रदेश आणि हरियाणासारख्या ठिकाणांहून टोमॅटोची आवक होत नाही.आता टोमॅटो बेंगलोर हून आयात केली जात आहे .दरम्यान येथे  टोमॅटोच्या दरात घट होण्याची शक्यता जाणवत नाही. नवीन टोमॅटो चे पीक लवकरच बाजारात येणार आहेत. परंतु हिमाचल प्रदेश आणि अन्य उत्पादक प्रदेशात जोरदार पाऊस झाल्यामुळे टोमॅटोचे दर असेच वाढत राहणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *