वाहन चालक परवाना, विवाह नोंदणी, मतदान ओळखपत्र, शाळेतील प्रवेश, पासपोर्ट इत्यादीसाठी तुम्ही अर्ज करत असाल तर ही बातमी फार महत्त्वाची आहे. या कामांसाठी कागदपत्रांच्या पडताळणीसाठी जन्म प्रमाणपत्राची आता महत्त्व वाढणार आहे.
एक ऑक्टोंबर पासून अनेक ठिकाणी आता जन्म प्रमाणपत्राचा वापर अत्यावश्यक कागदपत्र म्हणून होणार आहे . जन्म आणि मृत्यू नोंदणी संशोधन विधेयकाला राष्ट्रपतींनी देखील मंजुरी दिली आहे. याची अंमलबजावणी ही एक ऑक्टोंबर पासून होणार आहे या नव्या कायद्यामुळे नागरिकांच्या नोंदणीकृत जन्म तारखेची राष्ट्रीय राज्य पातळीवर माहिती गोळा करण्यासाठी मदत होणार आहे. विविध प्रकारचे सार्वजनिक सेवा चांगल्या पद्धतीने पुरवता येतील . आधार कार्ड प्रमाणे जन्म आणि मृत्यू प्रमाणपत्राचा वापर होईल.
एन एम अंतर्गत जन्म मृत्यूची नोंदणी अनिर्वाह्य करण्यात आली आहे . तसेच अनेक सरकारी कामांसाठी जन्म दाखला हा एकमेव कागद पुरेसा असल्याचे केंद्रीय मंत्रालयाने म्हटले आहे. जन्म आणि मृत्यूची नोंदणी सुधारित कायदा लागू झाल्यानंतर अनेक महत्त्वाची कामे सुलभ होतील. केंद्र सरकारने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार शैक्षणिक संस्थेत प्रवेश मतदार यादी तयार करणे वाहन चालविण्याचा परवाना आधार क्रमांक विवाह नोंदणीसाठी आता केवळ जन्म दाखला हे एकमेव कागदपत्र पुरेसे ठरणार आहे.
आता वरील सर्व सेवांसाठी जन्म प्रमाणपत्र हा एकच दस्तावेज म्हणून वापर करण्यास परवानगी दिली आहे. असे केंद्र गृह मंत्रालयाने स्पष्ट केले आहे . सरकारी नोकरीत नियुक्ती आणि तसेच केंद्राने ठरवून दिलेल्या इतर कोणत्याही कारणासाठी जन्म दाखला हा एकमेव कागद पुरेसा असणार आहे व हा नियम एक ऑक्टोबर पासून लागू होणार असून यामुळे नोंदणीकृत राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय डेटाबेस तयार करण्यात मदत होईल, असे गृहमंत्रालयाने म्हटले आहे.
1969 च्या कायद्यात सुधारणा करण्याची मागणी करणारे विधेयक केंद्रीय गृहराज्यमंत्री नित्यानंद राय यांनी पावसाळी अधिवेशनादरम्यान मांडले होते. दरम्यान संस्थेच्या दोन्ही सभागृहांनी गेल्या महिन्यात संपलेल्या पावसाळी अधिवेशनात जन्म आणि मृत्यूची नोंदणी सुधारणा विधेयक 2023 मंजूर केले होते. राज्यसभेने सात ऑगस्ट रोजी आवाजी मतदानाने विधेयक मंजूर केले तर लोकसभेने एक ऑगस्ट रोजी ते मंजूर केले.
जन्म प्रमाणपत्र डिजिटल जन्म आणि मृत्यू प्रमाणपत्रे मिळणार.
नवा कायदा लागू झाल्यानंतर जन्म आणि मृत्यू प्रमाणपत्र डिजिटल स्वरूपात मिळतील. सध्या त्याची छापील प्रत मिळेल तसेच त्यासाठी बराच वेळही लागतोय डिजिटल प्रक्रियेमुळे काम लवकर होईल.
या कामासाठी करता येईल वापर..
शाळेत प्रवेश, मतदान नोंदणी, वाहन चालक परवाना ,विवाह नोंदणी, पासपोर्ट बनवणे ,सरकारी नोकरी ,आधार नोंदणी.