मराठवाड्यात होणाऱ्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये 40 हजार कोटी रुपयांच्या पॅकेजची घोषणा होण्याची शक्यता आहे. सर्व विभागाने शनिवारी संभाजीनगरमध्ये होणाऱ्या मंत्रिमंडळ बैठकीसाठी वेगवेगळे प्रस्ताव पाठवले आहेत. यावर निर्णय होणार आहेत
राज्य मंत्रिमंडळाची या आठवड्यातील बैठक 16 सप्टेंबरला मराठवाड्यात होणार आहे . बैठकीसाठी जोरदार तयारी करण्यात आली आहे. या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घोषणांचा वर्षाव होणार आहे. मंत्रिमंडळ बैठकीत 40,000 कोटी रुपयांच्या पॅकेजची घोषणा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
सर्व विभागाने वेगवेगळे प्रस्ताव पाठवले असून आज रात्रीपर्यंत यावर निर्णय होणार असून यामध्ये सर्वाधिक सिंचन प्रकल्पाच्या संदर्भात तेरा ते चौदा हजार कोटी रुपयांच्या पॅकेजची घोषणा होणार आहे. मराठवाड्यात सात वर्षानंतर मंत्रिमंडळ बैठक होत आहे. त्यामुळे आगामी निवडणुका समोर ठेवून योजनांचा वर्षाव होणार आहे.
मंत्रिमंडळ बैठकीत काय निर्णय होण्याची शक्यता.
मराठवाड्याला दुष्काळमुक्त करण्यासाठी नदीजोड प्रकल्प फोकस केला जाणार आहे.
काही जुने सिंचन प्रकल्प आहेत ते आता चालत नाहीत, पण ते दुरुस्त करण्यासाठी भरपूर निधी दिला जाईल.
मराठवाड्यामध्ये सोयाबीन पिकाची लागवड मोठ्या प्रमाणात होत असल्यामुळे सोयाबीन रिसर्च सेंटरची घोषणा होणार
मराठवाड्यातील विद्यार्थ्यांसाठी कृषी कॉलेजची आणि मेडिकल घोषणा होणार.
मराठवाड्यात अनेक निजामकालीन शाळा आणि कार्यालय आहेत त्यांच्या पुनर्वसनासाठी निधीची तरतूद केली जाणार.
अनेक रस्त्यांची दुरवस्था ही त्याची कॉंक्रिटीकरण आणि नवीन पूल बांधले जाणार.
मराठवाडा मुक्ती संग्रामच्या वर्धापन वर्षा निमित्त पर्यटन आणि सांस्कृतिक विभागाच्या वतीने मराठवाडा मुक्ती संग्राम : वंदे मातरम मूव्हमेंट ही मराठवाड्याचा इतिहास सांगणार साहित्य प्रकाशन केलं जाणार
कोणत्या विभागाने किती निधीचा प्रस्ताव पाठवलेला आहे?
अंदाजित प्रस्ताव
– 21 हजार कोटी रुपयांचा प्रस्ताव सिंचन विभागाने पाठवला आहे, मात्र यातील 13 ते 14 हजार कोटी रुपयांच्या प्रस्तावाला मान्यता मिळणार.
– नगर विकास विभाग 150 कोटी
– सांस्कृतिक कार्य विभाग 200 कोटी
– उद्योग 200 कोटी
– क्रीडा – 600 कोटी
– शालेय शिक्षण 300 कोटी
– महिला व बालकल्याण विभाग 300 कोटी .
– वैद्यकीय शिक्षण 500 कोटी.
– कृषी 600 कोटी.
– ग्रामविकास 1200 कोटी
– सार्वजनिक बांधकाम 10 हजार कोटी
शनिवारी संभाजीनगर मध्ये होणाऱ्या मंत्रिमंडळ बैठकीसाठी सर्व विभागाने हे प्रस्ताव पाठवले आहेत या या प्रस्तावामध्ये कोणते विषय मान्यतेसाठी द्यायचे यासाठी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या अध्यक्षतेखाली समिती संघटित केले आहे ही समिती या प्रस्तावाच्या संदर्भात निर्णय घेऊन मंत्रिमंडळ बैठकीसमोर हे प्रस्ताव ठेवले जाणार आहेत