पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवसानिमित्त भाजपचा मेगा प्लॅन; या खास योजनाही सुरू करणार!

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवसानिमित्त भाजपचा मेगा प्लॅन; या खास योजनाही सुरू करणार

केंद्र सरकारच्या वतीने रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 73 व्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत.  भारतीय जनता पक्षाने रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त मेघा प्लॅन आखला असून विशेष कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.

भाजपचे कार्यालय सचिव शिवशक्ती नाथ बक्षी यांनी शुक्रवारी या संदर्भात माहिती देत असताना पंतप्रधान आवास योजना पीएम वेंडर आत्मनिर्भर निधी आणि आयुष्मान भारत योजनेसह विविध सरकारी योजनेची लाभार्थी 25 ते 50 च्या गटात घरामध्ये अथवा मंदिरामध्ये एकत्र येतील

अनेक कार्यक्रमाची योजना.. 

केंद्र सरकारच्या वतीने रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 73 व्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रमात आले आहेत. यामध्ये केंद्र सरकार आयुष्यमान भारत कार्यक्रमही सुरू करणार आहे . यामध्ये मुख्य आयुष्मान भारत योजनांचाही समावेश आहे.  यामध्ये आर्थिक दृष्ट्या कमकुवत असलेल्या लोकांना सबसिडीची सुविधा मिळते. याशिवाय पंतप्रधान नरेंद्र मोदी 17 सप्टेंबरला विश्वकर्मा जयंती निमित्त कारागीर शिल्पकार आणि पारंपरिक कामे करणाऱ्या कारागिरांना मदत म्हणून पीएम विश्वकर्मा नावाने एक नवीन योजना सुरू करणार आहेत. 

पीएम विश्वकर्मा योजनेअंतर्गत काय मिळणार.. 

सरकारने जारी केलेल्या निवेदनानुसार या योजनेअंतर्गत संबंधित व्यक्तीला प्रशिक्षण दरम्यान रोज पाचशे रुपये मानधनही दिले जाणार आहे . नवीन साधने खरेदी करण्यासाठी सरकार 15000 रुपयांची मदत करणार आहेत.  कामगारांना एक लाख रुपयांपर्यंतची कर्ज दिले जाईल,  एक लाखाच्या मदतीनंतर पुढील टप्प्यात केवळ पाच टक्के व्याजदराने दोन लाखापर्यंत ची कर्ज उपलब्ध करून देण्यात येईल.  याबरोबरच सरकार बँडिंग ,ऑनलाईन मार्केट ॲक्सिस यासाठी ही मदत करेल.  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या गोष्टी योजनेची घोषणा 15 ऑगस्ट ला देखील केली होती. 

तेरा हजार कोटी रुपयांचा निधी.. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्य दिनाच्या भाषणांमध्ये या योजनेचे आश्वासन दिले होते, या योजनेला केंद्र सरकार 13000 कोटी रुपयांचा निधी टप्प्याटप्प्याने उपलब्ध करून देणार आहे . या योजनेअंतर्गत संभाव्य लाभार्थीची बायोमेट्रिक आधारित पीएम विश्वकर्मा पोर्टल व सामान्य सेवा केंद्र द्वारे विनामूल्य नोंदणी केली जाईल.  17  सप्टेंबर रोजी पंतप्रधान यांचा 73 वा वाढदिवस देखील आहे. 

15000 चे टूलकिट प्रोत्साहन

योजनेच्या लाभार्थ्यांना पीएम विश्वकर्मा प्रमाणपत्र आणि ओळखपत्र मूलभूत आणि प्रगत प्रशिक्षणाचा समावेश असलेले कौशल्य अपग्रेडेशन रुपये 15000 ची टूलकिट प्रोत्साहन सवलतीच्या दरातील कर्ज अशा सुविधा दिल्या जाणार आहेत,  गुरु शिष्य परंपरा आणि पारंपारिक कौशल्याचा पाया मजबूत करणे हे या योजनेचे उद्दिष्ट आहे. 

18 पारंपरिक हस्तकला व्यवसाय समाविष्ट.. 

या योजनेत 18 पारंपारिक हस्त व्यवसाय समाविष्ट करण्यात आले असून त्यामध्ये सुतार, बोट बनवणारे , लोहार, हातोडा आणि अन्य उपकरणे तयार करणारे ,कुलूप तयार करणारे ,कुंभार ,सोनार, शिल्पकार दगड तोडणारे, गवंडी, टोपली झाडू बनवणारे, कोरीव काम ,भावली खेळणी बनवणारे, शिंपी आणि मासेमारी चे जाळे तयार करणारे अशा हस्तकला व्यवसायांचा समावेश आहे. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *