‘Shetkari Bhavan’: ‘शेतकरी भवन’ योजना राज्यात वेगाने राबवली जाणार…

‘Shetkari Bhavan’: राज्यातील नांदेड, जालना, कोल्हापूर आणि गडचिरोली या जिल्ह्यांतील कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये नव्याने शेतकरी भवन उभारण्यास शासनाने प्रशासकीय मान्यता दिली आहे. यात नांदेड जिल्ह्यातील बिलोली, जालना जिल्ह्यातील वडीगोद्री, कोल्हापूर जिल्ह्यातील वडगाव आणि गडचिरोली जिल्ह्यातील सिरोंचा येथील बाजार समित्यांचा समावेश आहे. या शेतकरी भवनांकरिता अंदाजे खर्च पुढीलप्रमाणे आहे, बिलोली येथे 1.52 कोटी, वडीगोद्री येथे […]
Water management : शेतीचा आधार सिंचन; आता जलव्यवस्थापनावर राज्याचा भर..

water management : शेतीसाठी पाणी हा अत्यावश्यक घटक असून, प्रभावी सिंचन व्यवस्थेमुळे उत्पादनक्षमता आणि शाश्वत शेतीस चालना मिळते. यासाठी जलसंपदा विभागाच्या वतीने १५ ते ३० एप्रिल २०२५ या कालावधीत राज्यभर ‘जलव्यवस्थापन कृती पंधरवडा’ साजरा करण्यात येणार आहे. पाण्याच्या सुयोग्य वापरासाठी, जलसाक्षरतेसाठी आणि पाणी बचतीविषयी जनजागृतीसाठी हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरणार आहे. या पंधरवड्याच्या माध्यमातून जल व्यवस्थापनाच्या […]
banana and mango gardens : उन्हाच्या झळांत केळी, आंबा बागांची अशी घ्या काळजी..

banana and mango gardens : सध्या राज्याच्या अनेक ठिकाणी उन्हाचा तीव्र चटका जाणवत असून, यामुळे फळबागा आणि भाजीपाला पिकांची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणीच्या ग्रामीण कृषि मौसम सेवा योजनेतील तज्ज्ञ समितीने दिलेल्या ताज्या सल्ल्यानुसार, केळी आणि आंबा बागा सध्या अत्यंत संवेदनशील अवस्थेत असून, योग्य उपाययोजना केल्यास उत्पादनात सुधारणा शक्य […]
Agricultural exporter : दिलासादायक अमेरिकेची उलट्या कराला स्थगिती; कृषी निर्यातदारांमध्ये उत्साह…

Agricultural exporter : मध्यंतरी अमेरिकेने भारतीय उत्पादनांवर लागू करावयाच्या ‘ उलटा कर’ (reciprocal tariff) धोरणाला ९० दिवसांची तात्पुरती स्थगिती दिली आहे. यामुळे भारतीय निर्यातदारांमध्ये, विशेषतः कृषी क्षेत्राशी संबंधित उत्पादकांमध्ये, पुन्हा उत्साह निर्माण झाला आहे. या निर्णयामुळे तांदूळ, मसाले, फळे, भाज्या, दूध आणि दुग्धजन्य पदार्थ यांसारख्या प्रमुख कृषी उत्पादनांची अमेरिका बाजारात होणारी निर्यात सध्या तरी स्थिर […]
Dam storage : राज्यातील धरणसाठा पन्नास टक्क्यांच्याही खाली..

Dam storage : राज्यात १० एप्रिल २०२५ रोजीपर्यंत सर्व धरणांमध्ये एकूण ४८२४३.६० दशलक्ष घनमीटर (द.ल.घ.मी.) पाणीसाठा असून, त्यापैकी उपयुक्त साठा १७३५८.७७ द.ल.घ.मी. इतका आहे. ही टक्केवारी ४२.८६ टक्के असून, गतवर्षी याच दिवशी ती ३६.३१ टक्के होती. यावरून यंदा पाणीसाठा जास्त असला तरी अनेक भागांत साठा समाधानकारक नाही. राज्यातील मोठ्या प्रकल्पांमध्ये एकूण साठा ४२.४२ टक्के इतका […]
kanda bajarbhav : हनुमानजयंतीला कांद्याला काय बाजारभाव मिळाला?

kanda bajarbhav : आज हनुमान जयंती असून महावीर जयंतीही आहे. त्यामुळे लासलगाव, निफाड बाजारसमित्यांसह राज्यातील अनेक बाजारसमित्यांमध्ये कांदा लिलावाला सुटी आहे. मात्र काही बाजारसमित्यांमध्ये कांद्याला चांगला बाजारभाव मिळताना दिसत आहे. आज दिनांक १० एप्रिल २५ रोजी खेड चाकण बाजारसमितीत कांद्याला कमीत कमी ११०० रुपये, जास्तीत जास्त १५०० रुपये आणि सरासरी १३०० रुपये बाजारभाव प्रति क्विंटलसाठी […]
Aadhaar Card : शेतकरी बांधवांनो, आता आधारकार्डची गरज संपली, कशी ते जाणून घ्या…

Aadhaar Card : शेतकरी बांधवांसह सामान्यांसा आता सरकारी कामांसाठी आधारकार्ड किंवा झेरॉक्स बाळगण्याची गरज उरणार नाही. केंद्र सरकारने एक महत्त्वाचा निर्णय घेत शेतकऱ्यांसह सर्वसामान्य नागरिकांसाठी ओळख प्रक्रिया अधिक सुलभ आणि सुरक्षित केली आहे. ‘फेस आयडी’ म्हणजेच चेहरा ओळखण्याच्या तंत्रज्ञानाचा वापर आता आधार ओळख म्हणून केला जाणार आहे.नवीन मोबाईल अॅपद्वारे ही सेवा उपलब्ध करून देण्यात आली […]
Heat wave : देशात उष्णतेची लाट कायम, राज्यात या भागात पावसाचा अंदाज…

Heat wave : आज १० एप्रिल २०२५ रोजी सकाळी दिलेल्या भारतरं हवामान खात्याच्या अंदाजानुसार, देशभरात तापमानात मोठे चढ-उतार होत असून काही भागांत उष्णतेची लाट आहे, तर काही ठिकाणी वादळी वाऱ्यांसह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. देशातील एकूण तापमान स्थिती पाहता, राजस्थान, मध्य प्रदेश, गुजरात, हरियाणा, आणि दिल्ली या भागांमध्ये उष्णतेची लाट जाणवत आहे. काल कांडला […]
UPI payment : शेतकऱ्यांसाठी युपीआय पेमेंटबाबत आनंदाची बातमी; असा झाला बदल..

UPI payment : रिझर्व्ह बँकेने (RBI) युपीआय (UPI) पेमेंटची मर्यादा वाढवण्याचा मोठा निर्णय घेतला असून, याचा थेट फायदा शेतकऱ्यांसह सामान्यांना होणार आहे. आता शेतकरी युपीआयच्या माध्यमातून एका व्यवहारात ५ लाख रुपयांपर्यंत पैसे भरू शकणार आहेत. यापूर्वी ही मर्यादा १ लाख रुपयांपर्यंत होती. शेतकऱ्यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी फी भरताना किंवा कुटुंबातील आरोग्य सेवांसाठी हॉस्पिटलमध्ये शुल्क भरताना मोठी […]
PM Kisan Yojana : आता पीएम किसानचा पुढचा हप्ता मिळणार नाही, समोर आले असे कारण..

PM Kisan Yojana : शेतकरी बांधवांनो, प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (PM Kisan Yojana) योजनेचा पुढील हप्ता म्हणजेच २०वा हप्ता तुम्हाला मिळण्याची शक्यता कमी आहे. याचे कारण म्हणजे हा हप्ता मिळवण्यासाठी सरकारने महत्त्वाची अट घातली आहे. ती म्हणजे, सर्व लाभार्थी शेतकऱ्यांनी ३० एप्रिल २०२५ पर्यंत ‘शेतकरी ओळखपत्र’ म्हणजेच ‘Farmer ID’ साठी नोंदणी करणे बंधनकारक आहे. ही […]