Onion producer : कांदा उत्पादकांना दिलासा, कांदा घोटाळा रोखण्यासाठी दक्षता समिती स्थापन..

Onion producer : महाराष्ट्रातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी दिलासादायक निर्णय घेण्यात आला आहे. केंद्र शासनाच्या किमत स्थिरीकरण योजनेअंतर्गत (PSF) नाफेड व एनसीसीएफमार्फत करण्यात येणाऱ्या कांदा खरेदी प्रक्रियेत पारदर्शकता यावी, गैरव्यवहार रोखले जावेत आणि शेतकऱ्यांपर्यंत लाभ पोहोचावा यासाठी राज्य सरकारने आता खरेदी केंद्रांवर दक्षता समित्या नियुक्त केल्या आहेत. राज्यातील नाशिक, पुणे, अहमदनगर, सोलापूर, सातारा, जळगाव आणि धुळे […]
Rameshwar Market : कांदा शेतकऱ्यांना फसविणाऱ्या उमराणेच्या रामेश्वर मार्केटवर कारवाई..

Rameshwar Market : नाशिक येथील उमराणे रामेश्वर कृषी उत्पन्न बाजार समितीमधील शेतकऱ्यांना कांद्याचे थकीत बिले अदा करण्यासाठी तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश पणन मंत्री जयकुमार रावल यांनी दिले आहेत. संचालक मंडळ, उपनिबंधक कार्यालय आणि व्यापारी यांच्यात समन्वय साधून यासंदर्भात उपाययोजना करावी आणि ४५ दिवसांच्या आत याबाबतचा अहवाल सादर करावा, असे निर्देशही श्री. रावल यांनी दिले. विधान […]
Weekly rates : सोयाबीन, तूर, मक्याने दिला शेतकऱ्यांना दिलासा; या पिकांचे साप्ताहिक दर मात्र…

Weekly rates : दि. १४ जुलै २०२५ रोजी सादर झालेल्या स्मार्ट प्रकल्पाच्या साप्ताहिक बाजारभाव अहवालानुसार तूर, मका आणि सोयाबीन या शेतमालांच्या किंमतीत किंचित वाढ झाली आहे, तर हरभरा, हळद, कांदा आणि टोमॅटो यांच्या किंमतीत घट नोंदवली गेली आहे. मागील आठवड्याच्या तुलनेत काही शेतमालांमध्ये किंमत घसरल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंता असली तरी काही शेतमालांनी बाजारपेठेत आपले स्थान टिकवून […]
Ujani Dam : उजनी शंभरीच्या जवळ, राज्यात प्रमुख धरणांचा साठा समाधानकारक, या धरणांतून विसर्ग सुरू..

Ujani Dam : राज्यात १८ जुलै २०२५ रोजी सकाळी ६ वाजेपर्यंत मिळालेल्या अहवालानुसार जायकवाडी, भंडारदरा, उजनी, निळवंडे, गंगापूर, दारणा, वैतरणा, गोसीखुर्द, कोयना, राधानगरी, पानशेत, खडकवासला ही राज्यातील प्रमुख धरणे ७० टक्क्यांहून अधिक भरली आहेत. काही धरणांमधून नदीपात्रात विसर्गही सुरू आहे. मराठवाड्यातील जायकवाडी धरण सध्या ८३.२९ टक्के भरले असून उपयुक्त साठा ७७.६१ टक्के आहे. अहमदनगर जिल्ह्यातील […]
Kanda bajarbhav : जुलैत कांदा बाजारभाव कमी, पण ट्रेंडनुसार काळजीचे कारण नाही..

Kanda bajarbhav: राज्यात यंदाच्या जुलै महिन्यात कांद्याचे घसरलेले दर पाहून अनेक कांदा उत्पादक शेतकरी चिंतेत आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत अनेक बाजार समित्यांमध्ये ५० टक्क्यांहून अधिक घट झाली आहे. विशेषतः छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर, नाशिक, पुणे, सोलापूर या प्रमुख जिल्ह्यांमध्ये दर घसरण प्रकर्षाने जाणवत आहे. मात्र मागील पाच वर्षांचा जुलै व जून महिन्यांतील दराचा इतिहास पाहता याला […]
Maharashtra rain update : राज्यात पावसाची क्षणभर विश्रांती आणि नंतर असा पडेल पाऊस…

Maharashtra rain update: भारतीय हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार राज्यात आणि देशात पुढील २४ तासांत काही भागांत मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. विशेषतः राजस्थान, केरळ, कर्नाटक आणि पश्चिम उत्तरप्रदेश या भागांमध्ये १८ जुलै रोजी अतिवृष्टीची शक्यता आहे. त्यामुळे या भागांत सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तथापि, महाराष्ट्रात मात्र कोणत्याही जिल्ह्यासाठी “रेड अलर्ट” नाही. पावसाचा […]
tomato market rate : राज्यात या बाजारात टोमॅटोचे बाजारभाव ४ हजारापर्यंत

Tomato market rate : बुधवार दिनांक १६ जुलै २०२५ रोजी महाराष्ट्रातील घाऊक बाजार समित्यांमध्ये टोमॅटोला सरासरी १००० ते ३४०० रुपये प्रति क्विंटल दर मिळाल्याचे नोंदवले गेले. यामध्ये सर्वाधिक कमाल दर नागपूरमधील स्थानिक (लोकल) टोमॅटोला ३२०० रुपये आणि हिंगणामधील टोमॅटोला तब्बल ४००० रुपये प्रति क्विंटल इतका मिळाला. हिंगणा बाजार समितीत टोमॅटोला ३३७५ रुपये सरासरी दर मिळाला […]
Kanda bajarbhav : या बाजारसमितीत मिळतोय सर्वाधिक कांदा बाजारभाव..

kanda bajrbhav : दिनांक १६ जुलै २०२५ रोजी राज्यातील विविध बाजार समित्यांमध्ये नोंदवण्यात आलेल्या कांद्याच्या घाऊक बाजारभावांवर नजर टाकल्यास, १४ जुलैच्या तुलनेत सरासरी बाजारभावात काहीशा घटेची नोंद झाली आहे. मागील काही दिवसांपासून राज्यातील अनेक भागांमध्ये उन्हाळी कांद्याची मोठ्या प्रमाणात आवक होत आहे. त्यामुळे बाजारात स्पर्धा वाढल्याने दरांमध्ये चढउतार दिसून येत आहे. लासलगाव या प्रमुख बाजार […]
Rainfall : पावसाचा खंड पडल्यास पिके वाचवण्यासाठी घ्यावयाची काळजी…

Rainfall : मराठवाड्यात जून महिन्यात सोयाबीन, कापूस, तुर, मूग, उडीद, ज्वारी यासारख्या खरीप पिकांची पेरणी मोठ्या प्रमाणावर झाली. मात्र, पेरणीनंतर अनेक भागांत पावसाचा खंड निर्माण झाला असून काही ठिकाणी १५ दिवसांपेक्षा जास्त पाऊस न झाल्यामुळे उगवलेली पिके ताणाखाली आली आहेत. या पार्श्वभूमीवर वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणीमार्फत शेतकऱ्यांना खालीलप्रमाणे उपाययोजना करण्याचे आवाहन करण्यात आले […]
Krushi Yojana : देशातील शंभर जिल्ह्यांमध्ये धन-धान्य कृषी योजनेला सुरूवात…

Krushi Yojana : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली काल झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत प्रधानमंत्री धन-धान्य कृषी योजनेला सहा वर्षांच्या कालावधीसाठी मंजुरी मिळाली. या योजनेचा प्रारंभ 2025-26 पासून 100 जिल्ह्यांत होणार आहे. ही योजना नीती आयोगाच्या आकांक्षी जिल्हा कार्यक्रमावर आधारित असून कृषी आणि पूरक/संलग्न क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करणारी पहिलीच योजना आहे. कृषी उत्पादकतेत वाढ करणे, पीक […]