Sowing of crops : एकच यंत्र करेल अनेक पिकांची पेरणी; न्यूमॅटिक प्लांटर बद्दल जाणून घ्या..

Sowing of crops : वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाने शेतकऱ्यांच्या मदतीसाठी एक अत्याधुनिक पेरणी यंत्र उपलब्ध करून दिले आहे. या यंत्राचे नाव न्यूमॅटिक प्लांटर असून याचा वापर विद्यापीठाच्या प्रक्षेत्रात प्रात्यक्षिकातून सुरू करण्यात आला आहे. हे यंत्र मल्टीक्रॉप म्हणजेच अनेक पिकांची पेरणी एकाच यंत्रातून करू शकते. यात विशेष प्रकारच्या प्लेट्स लावून कापूस, सोयाबीन, मका, हरभरा, मूग, […]

Hapus mango : कृषी क्षेत्रात राज्याची चमकदार कामगिरी; हापूस आंब्याला सुवर्णपदक…

Hapus mango : एक जिल्हा एक उत्पादन 2024’ अंतर्गत महाराष्ट्राने चमकदार कामगिरी केली असून राज्याला ‘अ’ श्रेणीतील सुवर्ण पदक प्राप्त झाले आहे. यासह रत्नागिरी, नागपूर, अमरावती, नाशिक आणि अकोला या जिल्ह्यांनी कृषी आणि गैर-कृषी क्षेत्रातील विशिष्ट उत्पादनांसाठी सुवर्ण, रौप्य, कांस्य आणि विशेष उल्लेख पुरस्कार पटकावले आहेत. भारत मंडपममध्ये राष्ट्रीय ‘एक जिल्हा, एक उत्पादन’ 2024 पुरस्कार […]

Amravati Market Committee : घोटाळ्यानंतर अमरावती बाजारसमितीचे संचालक मंडळ होणार बरखास्त..

Amravati Market Committee : ज्वारी खरेदीत झालेल्या घोटाळ्यानंतर अमरावती कृषी उत्पन्न बाजारसमितीचा गैरकारभार चव्हाट्यावर आला असून मागील आठवड्यापासून हा विषय विधिमंडळाच्या अधिवेशनातही गाजत आहे. या पार्श्वभूमीवर आता संचालक मंडळच बरखास्त करण्यात येणार असल्याचे समजत आहे. अमरावती कृषी उत्पन्न बाजार समितीतील अनियमिततेच्या प्रकरणावर उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार योग्य ती कार्यवाही करण्यात येणार आहे. बाजार समितीचे संचालक मंडळ […]

Turmeric research : मराठवाड्यात हळद संशोधनाला येणार गती; निधी वितरीत

Turmeric research : मराठवाड्यासाठी महत्त्वपूर्ण असलेल्या ‘मा. बाळासाहेब ठाकरे हरिद्रा (हळद) संशोधन व प्रशिक्षण केंद्र’ प्रकल्पासाठी यापूर्वी मंजूर केलेल्या 100 कोटींपैकी उर्वरित 26 कोटी रुपयांचा निधी तत्काळ वितरित करण्यात येणार असल्याची माहिती रोजगार हमी योजना, फलोत्पादन खारभूमी विकास मंत्री भरत गोगावले यांनी विधानपरिषदेत दिली. या प्रकल्पाचा एकूण खर्च 709 कोटी रुपये असून, त्यास वित्त विभागाची […]

Agriculture abroad : शेतकरी बांधवांनो, यंदा परदेशातील शेती पाहायचीय? मग हे वाचाच…

Agriculture abroad : राज्यातील शेतकऱ्यांना विविध प्रगत देशातील विकसित आणि आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती होण्यासाठी ‘शेतकऱ्यांचे देशाबाहेर अभ्यास दौरे सन २०२५-२६’ ही योजना राबविण्यात येणार आहे. या योजनेतंर्गत युरोप, इस्राईल, जपान, चीन, दक्षिण कोरिया व मलेशिया, व्हिएतनाम, फिलीपाईन्स या देशांत शेतकऱ्यांचे अभ्यासदौरे आयोजित करण्याकरिता प्रवासी कंपनीची निवड करण्यात येणार आहे. या योजनेंतर्गत GeM पोर्टलवर १४ जुलै, […]

Maharashtra rain alert : कोकण, मध्य महाराष्ट्रात दमदार, तर अनेक ठिकाणी पावसाची विश्रांती..

Maharashtra rain alert : भारतीय हवामान विभागाने १६ जुलै रोजी सकाळी जारी केलेल्या अंदाजानुसार महाराष्ट्रातील पावसाचा स्वरूप विभागानुसार वेगळा राहणार आहे. काही भागांमध्ये दमदार पावसाची शक्यता असून काही ठिकाणी उघडीप जाणवू शकते. कोकण व गोवामध्ये १६ ते २२ जुलैदरम्यान बहुतेक ठिकाणी पावसाचे प्रमाण जास्त राहणार आहे. दररोज बहुतांश भागांत जोरदार सरी येण्याची शक्यता असून, किनारी […]

Govt job : सरकारी नोकरीची आनंद वार्ता: राज्यात या विभागात होणार मेगाभरती..

Govt job : मृद व जलसंधारण विभागाच्या कामकाजात गतिमानता आणण्यासाठी आणि कार्यरत असणाऱ्या यंत्रणेला बळकटी देण्यासाठी शासनाने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. या पार्श्वभूमीवर मृद व जलसंधारण विभागाने नव्याने एक आकृतिबंध तयार करून तो वित्त विभागाकडे पाठवला होता. या प्रस्तावानुसार, ८६६७ पदांना वित्त विभागाने मान्यता दिली असून, ही पद भरती लवकरच केली जाईल, अशी माहिती मृद […]

Milk producer : अमेरिका व्यापार करारामुळे महाराष्ट्रातील दूध उत्पादक येणार संकटात..

Milk producer : भारतातील दूध उद्योग जर अमेरिकेसारख्या मोठ्या देशांसाठी खुला झाला, तर देशातील आणि महाराष्ट्रातील लाखो दूध उत्पादक शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसू शकतो, असा इशारा स्टेट बँक ऑफ इंडियाच्या संशोधन विभागाने दिला आहे. सध्या केंद्र सरकार आणि अमेरिका यांच्यात व्यापार करारावर चर्चा सुरू आहे. या करारांतर्गत दुधाचे उत्पादन आणि त्यावरील प्रक्रिया क्षेत्र परदेशी […]

Agricultural market : पालघरजवळ होणार आंतरराष्ट्रीय कृषी बाजारपेठ?

Agricultural market : महामुंबई आंतरराष्ट्रीय कृषी बाजारपेठ स्थापन करण्यासाठी पालघर जिल्ह्यातील दापचरी येथील जागेची पाहणी करण्यात यावी. याचबरोबर राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या बळकटीकरणासाठी सचिवांच्या राज्यस्तरीय केडरच्या निर्मितीसाठी प्रस्ताव मंत्रिमंडळाच्या मान्यतेकरिता सादर करावा, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. विधानभवन येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली महामुंबई आंतरराष्ट्रीय कृषी बाजारपेठ स्थापन करण्याबाबत बैठक घेण्यात […]

maharashtra dam water storage : उजनी शंभरीकडे; जायकवाडी पंचाहत्तरीत; राज्याचा धरणसाठा असा आहे*

आज दि. १५ जुलै २०२५ रोजीच्या जलसंपदा विभागाच्या अहवालानुसार, महाराष्ट्रातील सर्व धरणांमधील एकूण साठवणुकीपेक्षा उपलब्ध पाणीसाठा ६०.२७ टक्के इतका झाला आहे. उपयुक्त पाणीसाठा मात्र ५० टक्क्याच्या वर म्हणजेच ५१.५ टक्क्याच्या आसपास आहे. मागील वर्षी याच दिवशी साठा ३०.६५ टक्क्यांवर होता. त्यामुळे राज्यात एकूण पातळी समाधानकारक आहे, पण विभागीय असमतोल अजूनही कायम आहे. मोठ्या धरणांमध्ये सध्या […]