kanda bajarbhav : देशात कांदा आवक वाढली; महाराष्ट्राचा वाटा सर्वाधिक; मध्यप्रदेशात घट..

Kanda bajaebhav : मागील आठवड्यात कांदा बाजारभाव घसरण झाल्याचे दिसून आले, याचे कारण म्हणजे आषाढी एकादशीनंतर राज्यात वाढलेली आवक. देशातील कांद्याची बाजारातील आवक ६ ते १२ जुलै २०२५ या आठवड्यात मागील आठवड्याच्या तुलनेत काहीशी वाढलेली दिसून आली आहे. २९ जून ते ५ जुलै या आठवड्यात देशभरात एकूण २९७७१२.९८ मेट्रिक टन कांदा बाजारात आला होता. त्यानंतर […]

maharashtra rain update: पावसाची दोन आठवड्यांची उघडीप! राज्यात बहुतेक भागांत पावसाचा जोर कमी…

maharashtra rain update:  दिनांक ११ जुलैपासून पावसाचा जोर कमी व्हायला सुरूवात झाली आहे. पुढील दोन आठवडे म्हणजेच २४ जुलैपर्यंत महाराष्ट्रातील बहुतांश भागांत पावसाची उघडीप राहण्याची शक्यता हवामान विभागाचे निवृत्त हवामानतज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी व्यक्त केली आहे. मुंबईसह कोकण भाग वगळता राज्यात फारसा पाऊस न पडता, आकाश बहुतांशी ढगाळ तर कधी कधी उघडे राहणार असल्याचे दिसते. […]

cotton market rate : कापसाला यंदा हमीभाव मिळणार का? जाणून घ्या ऑक्टोबरचा संभाव्य बाजारभाव..

ऑक्टोबर ते डिसेंबर २०२५ या कालावधीत कापूस बाजारभाव सरासरी ७ हजार ४०० ते ८ हजार ४०० रुपये प्रति क्विंटल दरम्यान राहण्याचा अंदाज आहे. मागील वर्षी म्हणजेच २०२४ मध्ये सरासरी दर ७ हजार ९० रुपये होता. या दरातील घसरण मागील काही महिने जागतिक उत्पादनात घट, व्यापार धोरणे, आणि देशांतर्गत साठवणुकीच्या समस्यांमुळे झाली आहे. तरीही २०२५ च्या […]

soybean bajarbhav: या खरीपातील सोयाबीनचे बाजारभाव या वर्षीही असणार हमीभावापेक्षा कमी?*

soybean bajarbhav : कृषी विभागाने दिलेल्या माहितीनुसार जुलैच्या पहिल्या आठवड्यापर्यंत मागील वर्षाच्या तुलनेत सोयाबीनचा पेरा घटला आहे. याचे कारण म्हणजे यंदा सोयाबीनला मिळालेला कमी बाजारभाव. सोयाबीन उत्पादनात सध्या आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत घटक मोठा प्रभाव पाडत आहेत. ऑक्टोबर ते डिसेंबर २०२५ या कालावधीत सोयाबीनचा संभाव्य बाजारभाव ४६०० ते ५१०० रुपये प्रति क्विंटल दरम्यान राहू शकतो असा […]

Maize sowing : यंदा मका पेरलाय? जाणून घ्या ऑक्टोबर ते डिसेंबरचे संभाव्य दर..

Maize sowing : सध्या खरीप हंगामात अनेक शेतकरी मका पिकाकडे वळताना दिसत आहेत. यामागे बाजारातील स्थिर मागणी, आंतरराष्ट्रीय स्तरावरील उत्पादनातील घट व देशांतर्गत पातळीवरील कमी साठा हे प्रमुख घटक आहेत. ऑक्टोबर ते डिसेंबर २०२५ या कालावधीसाठी मका या पिकाच्या किंमती २२५० रुपये प्रति क्विंटलपर्यंत राहण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. मागील तीन वर्षांतील तुलना करता, […]

Ministry of Agriculture : बनावट खतांविरोधात केंद्रीय कृषी मंत्रालयाची विशेष मोहीम…

Ministry of Agriculture : केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री शिवराजसिंह चौहान यांनी सर्व राज्ये व केंद्रशासित प्रदेशांच्या मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून बनावट व निकृष्ट खतांच्या विरोधात तातडीने आणि कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. देशभरात बनावट खतांची विक्री, अनुदानित खतांचा काळाबाजार तसेच सक्तीचे टॅगिंग यासारख्या बेकायदेशीर प्रकारांना आळा घालण्याच्या उद्देशाने हे पत्र पाठवण्यात आले आहे. […]

Advice for sowing : मराठवाड्यात पेरण्या लांबल्या; सोयाबीन, कापसाच्या पेरणीसाठी सल्ला..

Advice for sowing : मराठवाडा विभागात यंदाच्या खरीप हंगामात अनेक भागांमध्ये अद्याप समाधानकारक पाऊस झालेला नाही. परिणामी, मोठ्या प्रमाणावर खरीप पेरणी लांबली आहे. वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणीच्या ग्रामीण कृषी मौसम सेवा योजनेतून 11 ते 24 जुलै 2025 या कालावधीसाठी हवामानाचा आणि पेरणीयोग्य परिस्थितीचा अभ्यास करून शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणारा सल्ला जारी करण्यात आला आहे.  […]

Maharashtra rain update : महाराष्ट्रात पावसाचा जोर काहीसा कमी, पण पुढील आठवड्यात वाढणार..

Maharashtra rain update : राज्यात सध्या पावसाचे प्रमाण काहीसे कमी झाले असले तरी कोकण, विदर्भ आणि घाटमाथ्यावर अधूनमधून पावसाच्या सरी पडत आहेत. गेल्या २४ तासांतही राज्याच्या काही भागांत पावसाची नोंद झाली आहे. मात्र, मराठवाडा व मध्य महाराष्ट्रातील काही भाग कोरडे राहिले आहेत. भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार पुढील सात दिवसांत कोकण, गोवा, विदर्भ व काही प्रमाणात […]

Agricultural quality : गुड न्यूज, राज्यात पशुपालनाला आता शेतीचा दर्जा; असा होणार लाभ..

Agricultural quality : पशुपालन व्यवसायास प्रोत्साहन देण्यासाठी राज्यात पशुपालन व्यवसायास ‘कृषी व्यवसायाचा’ दर्जा देण्यात आला आहे. राज्यातील पशुपालन व्यवसायाला मोठा दिलासा देणारा हा निर्णय असून असा निर्णय घेणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य असल्याची माहिती पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांनी विधानसभेत निवेदनाद्वारे दिली. पशुपालन व्यवसायास प्रोत्साहन देण्यासाठी हा क्रांतीकारी निर्णय घेतला आहे. या निर्णयाचा लाभ […]

Dispute over agriculture : हक्काच्या वहिवाटीसाठी शेतरस्त्यावरून वाद होतात? आता मिळेल दिलासा..

Dispute over agriculture : हक्काच्या शेतात वहिवाटीसाठी शेतकऱ्यांना अनेकदा अडचणी सहन कराव्या लागतात, त्यावरून वाद आणि कोर्टकचेऱ्याही होतात. मात्र लवकरच त्यातून दिलासा मिळणार आहे. प्रत्येक शेतकऱ्याच्या शेताला रस्ता देण्यासाठी शासन कटिबद्ध आहे. शेतात जाण्यासाठी, शेतमालाची ने-आण करण्यासाठी शेतरस्त्यांच्या निर्मितीसाठी विविध योजनांच्या निधीचा समन्वय साधून समग्र योजना शासन आणणार आहे. ही योजना संपूर्ण राज्यातील शेतकऱ्यांच्या शेत […]