Agriculture Minister : कृषिमंत्री कोकाटेंचा ‘गेम’ संपणार? राजीनाम्याचे संकेत, अजित पवारांच्या भूमिकेकडे लक्ष…

Agriculture Minister : महाराष्ट्र विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे मोबाईलवर पत्ते (रमी) खेळतानाचा एक व्हिडिओ व्हायरल झाल्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. या व्हिडिओमुळे विरोधकांनी त्यांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली असून, आता उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांनीही अप्रत्यक्षपणे यावर गंभीर भूमिका घेतल्याचे संकेत मिळत आहेत. या घटनेमुळे कोकाटे यांचा […]

Dam storage : राज्यात आढळा, सीना, विसापूर १०० टक्के भरली, इतर ठिकाणी असा आहे धरणसाठा…

Dam storage :   दि. २१ जुलै २०२५ रोजी सकाळी ६ वाजेपर्यंतच्या अहवालानुसार, राज्यातील अनेक प्रमुख धरणांमध्ये समाधानकारक पाणीसाठा झाला असून काही धरणे पूर्ण क्षमतेने भरली आहेत. विशेषतः अहमदनगर जिल्ह्यातील आढळा धरण १०० टक्के भरले असून ते ओव्हरफ्लो झाले आहे. त्याशिवाय सीना आणि विसापुर धरणांनीही आपली क्षमता गाठली आहे. नगर जिल्ह्यातील भंडारदरा धरणात ८३६० दलघफूट पाणी […]

kanda market rate : सप्ताहात कांद्याची आवक वाढली; दर काहीसे स्थिर..

Onion arrival : दिनांक १३ जुलै ते १९ जुलै २०२५ या आठवड्यात महाराष्ट्रातील घाऊक बाजारांमध्ये कांद्याचे दर काही प्रमाणात स्थिर होते. विशेषतः उन्हाळी कांद्याला त्यातले त्यात बरा दर, तर लोकल कांद्याचे दर तुलनेने कमी राहिले. या काळात संपूर्ण राज्यातील कांद्याची सरासरी आवक सुमारे ३ लाख क्विंटलच्या आसपास राहिली. त्यात मुख्यतः उन्हाळी कांद्याचे प्रमाण जास्त होते. […]

kanda bajar bhav : भारतातून बांग्लादेशात शिलाँग मार्गे कांद्याची होतेय तस्करी?

kanda bajar bhav : बांग्लादेशात कांदा निर्यात कधी सुरू होईल आणि स्थानिक बाजारात कांद्याचे भाव कधी वाढतील या प्रतिक्षेत असलेल्या कांदा उत्पादकांना धक्का देणारी एक बातमी पुढे येत असून सध्या मेघालयातून बांग्लादेशात तस्करीच्या माध्यमातून कांदा पाठवला जात असल्याचे समजत आहे. यासंदर्भात बांग्लादेशातील काही व्यापाऱ्यांनी मराठवाड्यातील काही व्यापाऱ्यांना ही माहिती दिल्याचे खात्रीलायक रित्या समजत आहे. मात्र […]

Veterinary clinics : राज्यात ३५७ ठिकाणी पशुवैद्यकीय दवाखान्यांना मिळणार नवीन इमारती…

veterinary clinics : राज्यात ३५७ ठिकाणी पशुवैद्यकीय दवाखान्याला नवीन इमारती मिळणार आहेत. जिल्हा वार्षिक योजनेतून इमारत बांधकामासह दवाखान्याची दुरूस्ती, स्वच्छतागृह व उपकरण खरेदी यासाठी ४५८ कोटी ४१ लाख ३४ हजार रूपयांची तरतूद करण्यात आली असल्याची माहिती पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांनी दिली. पशुसंवर्धनाला कृषी व्यवसायाचा दर्जा देणारे देशातील पहिले राज्य करण्याचा निर्णय घेतल्यानंतर राज्यातील पशुवैद्यकीय […]

Maharashtra rain alert : महाराष्ट्रात जोरदार पावसाची शक्यता..

Maharashtra rain alert:  आज, सोमवार, २१ जुलै (लहान एकादशी) पासून महाराष्ट्रात पावसाची शक्यता आहे. हा पाऊस पुढील आठवडाभर, म्हणजेच २८ जुलै (पहिला श्रावणी सोमवार) पर्यंत सुरू राहील असा अंदाज आहे. माजी हवामानशास्त्रज्ञ, माणिकराव खुळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्रात सोमवार, २१ जुलै २०२५ पासून पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मध्यम ते जोरदार पाऊस अपेक्षित:पुढील आठवड्यात एकूण […]

Important tips : सोयाबीन, बाजरी, उस आणि हळद व्यवस्थापनाच्या महत्त्वाच्या टिप्स..

Important tips : विस्तारीत हवामान अंदाजानुसार मराठवाड्यात १८ ते २४ जुलै २०२५ दरम्यान पावसाचे प्रमाण सरासरीपेक्षा कमी राहणार असून कमाल तापमान सरासरीइतके ते थोडेसे अधिक राहण्याची शक्यता आहे. २५ ते ३१ जुलै दरम्यान मात्र पावसाचा अंदाज सरासरीइतकाच असून तापमानात फारसा बदल होणार नाही. सॅक-इसरो, अहमदाबादच्या उपग्रह चित्रानुसार मराठवाड्यात बाष्पोत्सर्जनाचा वेग किंचित घटलेला आहे. याचा परिणाम […]

Green electricity revolution : हरित वीज क्रांती आणि पोलीस भरतीतून शेतकरी व युवकांना दिलासा..

Green electricity revolution : महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना परवडणारी आणि शाश्वत वीज देण्यासाठी हरित ऊर्जा क्षेत्रात ऐतिहासिक पावले उचलण्यात आली असून दुसरीकडे राज्यातील युवकांसाठी मोठ्या प्रमाणात पोलीस भरती प्रक्रिया राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. विधानसभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही माहिती दिली. मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य ठरणार आहे जे शेतकऱ्यांना हरित वीज पुरविणार […]

Legislative session : विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन संस्थगित; पुढील अधिवेशन ८ डिसेंबर रोजी नागपुरात…

Legislative session : विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन काल शुक्रवारी राष्ट्रगीताने संस्थगित करण्यात आले. पुढील अधिवेशन दि. ८ डिसेंबर २०२५ रोजी नागपूर येथे होणार असल्याची घोषणा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांनी विधानसभेत केली. विधानसभेत प्रत्यक्षात १३३ तास कामकाज:विधानसभेत प्रत्यक्षात १३३ तास ४८ मिनिट कामकाज झाले. रोजचे सरासरी कामकाज ८ तास ५५ मिनिटे झाले. या अधिवेशनात विधानसभेत सदस्यांची […]

Role of NCCF : हजारो कोटींच्या कांदा घोटाळ्यात NCCF ची भूमिका संशयास्पद..

Role of NCCF : केंद्र सरकारच्या किंमत स्थिरीकरण योजनेअंतर्गत शेतकऱ्यांकडून कांदा खरेदी करणारी नॅशनल कोऑपरेटिव्ह कन्झ्युमर्स फेडरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (NCCF) ही संस्था सध्या गंभीर आरोपांच्या भोवऱ्यात अडकली आहे. माहिती अधिकार कायद्यानुसार विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देण्यास NCCF ने स्पष्ट नकार दिला असून त्यामुळे सुमारे पाच हजार कोटींच्या कांदा साठवण घोटाळ्याला नवे वळण मिळाले आहे. यातून […]