राज्यातील अतिवृष्टी, सततच्या पावसामुळे, विविध नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित झालेल्या परंतु अद्यापही शासनाची मदत न मिळालेल्या शेतकऱ्यांसाठी अतिशय दिलासादायक अपडेट आहे. राज्यामध्ये महसूल दिनापासून अर्थात एक ऑगस्ट 2023 पासून महसूल विभागाच्या माध्यमातून महसूल सत्ता राबवला जाणार आहे. त्याच्यामध्ये एक ऑगस्टपासून 2, ऑगस्ट,3ऑगस्ट, 4 ऑगस्ट, 5ऑगस्ट, असे वेगवेगळे उपक्रम राबवले जाणार आहेत . याच्याच मध्ये तीन ऑगस्ट रोजी शेतकऱ्यांच्या मदतीच्या वाटपाचे वितरण देखील होणार आहे.
एकंदरीत आपण जर पाहिले तर राज्यातील मोठ्या प्रमाणात होणाऱ्या अतिवृष्टीमुळे, गारपीट ,याच प्रमाणे सततच्या पावसामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. नुकसान झालेल्या काही शेतकऱ्यांना मदत मिळालेली आहे. तर काही शेतकऱ्यांना मदत मिळालेली नाही . परंतु नेमके अनुदान वाटप कधी होणार याचा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा राहिलेला आहे,आणि याच्यासाठी आता महसूलविभागाच्या माध्यमातून हा उपक्रम हाती घेण्यात आलेल्या आहे. याच्यासाठी राज्यामध्ये महसूल सत्ता आयोजित करण्यात आलेली आहे. .
3 ऑगस्ट रोजी, एक हात मदतीचा
पूर्व मान्सुन व मान्सुन कालावधीत अवकाळी पाऊस / अतिवृष्टी/पूर यामुळे बाधित झालेल्या नागरिकांच्या घरांचे / शेतीचे / फळबागांचे / जनावरांचे झालेल्या नुकसानीबाबत आपत्ती व्यवस्थापन अधिनियम, 2005 मधील तरतुदीनुसार, बाधीत नागरिकांना देय असलेल्या सोई सुविधा, नुकसान भरपाई देण्यात आली आहे का? किवा कसे, याबाबत सर्व कार्यालयीन आढावा घेऊन पात्र नागरिकांना लाभ देण्याबाबतची कार्यवाही करण्यात यावी.
तसेच, खरिप हंगामामध्ये घेण्यात येणा-या पिकांचे विमा उतरविण्याकरीता, अर्जदारांच्या मागणीनुसार, पिक पेरा अहवाल, सात बारा व 8-अ असे तलाठी स्तरावरुन देय असलेले विविध दाखले देण्यात आलेले आहेत. किंवा कसे, याबाबतचा आढावा घेऊन प्रलंबित असलेले दाखले संबंधितांना तात्काळ प्रदान करण्यात यावेत
आवश्यकतेनुसार अतिवृष्टी/पूर अशा नैसगिक आपत्तीच्या परिस्थितीत संबंधित यंत्रणा/ नागरिकांनी घ्यावयाची काळजी याबाबतच्या सुचना प्रसारमाध्यमाव्दारे समाजमाध्यमाव्दारे संबंधित क्षेत्रातील अधिकारी, पदाधिकारी यांच्या मार्फत सर्व संबंधित घटकापर्यंत पोहचविण्याची व्यवस्था करण्यात यावी.
नैसगिक आपत्ती अंतर्गत पुनर्वसनाच्या अनुषंगाने महसूल कार्यालयांशी संबंधित अडचणींचे निराकरण करण्यात यावे.
तालुक्यातील अतिदुर्गम गावात “महसूल अदालत आयोजित करण्याबाबत कार्यवाही करावी.