पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेचा 14 वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झालेला आहे. राजस्थान मधून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हा हप्ता जमा केला आहे. या योजने अंतर्गत शेतकऱ्यांच्या खात्यात 2000रुपयांचा हप्ता जमा करण्यात आलेला आहे. त्यामुळे देशभरातील नऊ लाख शेतकऱ्यांचे चेहेरे खुले आहेत.
शेतकऱ्यांची प्रतिक्षा संपली
शेतकऱ्यांच्या खात्यावर पंतप्रधान सन्मान निधी योजनेचा 14 वा हप्ता जमा करण्यात आलेला आहे केंद्र सरकारने शेतकऱ्यांच्या खात्यात दोन हजार रुपये जमा केले आहेत व राज्य त्यांना 9 लाख शेतकऱ्यांच्या खात्यात वीस हजार कोटी रुपये जमा करण्यात आलेले आहेत.
ई-केवायसी आवश्यक
▪️ई-केवायसी करून घ्या, असे शेतकऱ्यांना सातत्याने सांगितले जात होते. यानंतरही तुम्ही ई-केवायसी केले नसेल, तर तुमचे नाव लाभार्थी यादीतून काढून टाकले गेले असते.
▪️भुलेखांच्या पडताळणीत जमिनीच्या नोंदी चुकीच्या आढळल्यास त्यांना वंचित ठेवता येते.
अशी करावी तक्रार
पी एम किसान योजनेत जर आपला हप्ता जमा झाले नसेल तर त्याविषयी चौकशी करावी. तुम्ही याविषयी तक्रार करण्यासाठी ई-मेल आयडी pmkisan-ict@gov.in यावर संपर्क साधा,तसेच खालील हेल्पलाइन क्रमांक वर संपर्क साधावा.
पीएम किसान लँडलाईन क्रमांक : 011-23381092 , 011-23382401
पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजना : 155261, 18001155266
14वा हप्ताप्रकरणात अडचण असल्यास : 011-24300606
आपले नाव यादीमध्ये असे तपासा
▪️ पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेचे अधिकृत पोर्टल pmkisan.gov.in वर लॉगईन करा.
▪️ या ठिकाणी लाभार्थ्याची यादी पर्याय दिसेल या ऑप्शनवर क्लिक करा.
▪️ तुमचे राज्य तालुका जिल्हा आणि गावाचे नाव तुमच्या नावाचा तपशील भरा.
▪️ सविस्तर माहिती द्या या पर्यायावर क्लिक करा
▪️ यादी समोर येईल त्यामध्ये तुमचे नाव शोधा.
▪️ योजनेच्या यादीत तुमचे नाव असेल तर तुम्हाला हप्ता मिळेल.
असा चेक करा बॅलेन्स
▪️ योजनेतंर्गत 14 वा हप्ता जमा करण्यात आला आहे. बँकेकडून खात्यात रक्कम जमा करण्याचा मॅसेज आला असेल. तसेच केंद्र सरकारतर्फे पण पीएम किसान योजनेचा मॅसेज लाभार्थ्यांच्या नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर पाठविण्यात आला आहे.
▪️ काही तांत्रिक कारणामुळे मॅसेज चेक करता आला नसेल. तर लाभार्थी जवळच्या एटीएमवर जाऊन बँलेन्स चेक करु शकतो. तो मिनी स्टेटमेंट काढू शकतो. त्यावरुन बँक खात्यात रक्कम जमा झाले की नाही, हे कळेल.
▪️ बँकेच्या मिस्ड कॉल क्रमांकाचा वापर करता येईल. मिस्ड कॉल देऊन तुम्हाला एकूण शिल्लक रक्कम माहिती होईल. त्यावरुन योजनेचा हप्ता जमा झाला की नाही, हे स्पष्ट होईल.
▪️ शेतकऱ्याकडे एटीएम कार्ड नसेल तर तो जवळच्या बँकेतील शाखेत जाऊन पासबुक अपडेट करु शकतो. त्यावर आतापर्यंतच्या सर्व व्यवहाराची नोंद होईल. त्यावरुन खात्यात रक्कम आली की नाही हे समोर येईल.