wheat & sorghum : ज्वारी पिकाच्या फुलोरा ते दाणे पक्व होण्याच्या अवस्थेत कणसातील अळ्या या किडीचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असते. तसेच प्रादुर्भाव जास्त असल्यास झाड वाळते.
अळ्या दुधाळ अवस्थेतील दाणे खातात. विष्ठेमुळे दाण्याची प्रत खराब होते. म्हणून २० अळ्या प्रति कणीस आढळल्यास, नियंत्रणासाठी क्विनॉलफॉस २५ ईसी २ मिली प्रति लिटर पाणी मिसळून याप्रमाणे फवारणी करावी.
ज्वारीचे पीक जातीपरीत्वे ११० ते १३० दिवसांत काढणीस तयार होते. ज्वारीच्या दाण्याच्या टोकाजवळ काळा ठीपक्याचे लक्षणे दिसताच ज्वारीची काढणी करावी व ८ ते १० दिवस कणसे उन्हात वाळवून मळणी करावी.
गहू पिकाचे व्यवस्थापन:
गहू ओंबीवर आल्यावर उंदीर नासाडी करतात. उंदरांचा वेळीच बंदोबस्त न केल्यास ३ ते २१ टक्क्यांपर्यंत गव्हाचे नुकसान होते. उंदराच्या नियंत्रणासाठी विषारी अमिषांचा वापर करावा.
आमिष तयार करण्याकरिता कोणत्याही धान्याचा जाडाभरडा ५० भाग त्यात एक भाग झिंक फॉस्फाईड मिसळावे.
यामध्ये थोडेसे गोडेतेल टाकून चांगल्या प्रकारे मिश्रण तयार करून प्रत्येक बिळामध्ये साधारणपणे एक चमचा मिश्रण काठीच्या सहाय्याने खोलवर टाकावे व बिळे पालापाचोळा वा गवत टाकून झाकून घ्यावीत व बिळांची तोंडे चिखलाने बंद करावीत. तसेच पिंजऱ्याचा उपयोग करून उंदीर पकडावेत.












