Tomato market price : आज दिनांक १४ फेब्रुवारी रोजी पुणे बाजारात लोकल टोमॅटोची २१९१ क्विंटल आवक झाली. कमीत कमी बाजारभाव ४००, जास्तीत जास्त १ हजार आणि सरासरी ७०० रुपये बाजारभाव मिळाला. खेड-चाकण बाजारात टोमॅटोची १९४ क्विंटल आवक झाली. कमीत कमी बाजारभाव ५०० रुपये जास्तीत जास्त ८०० रुपये आणि सरासरी ७०० रुपये बाजारभाव मिळाले.
पुणे पिंपरी बाजारात आज टोमॅटोला कमीत कमी १ हजार, जास्तीत जास्त १२०० रुपये आणि सरासरी ११०० रुपये बाजारभाव मिळाला. पाटण बाजारात टोमॅटोला किमान १२०० रुपये, कमाल १४०० रुपये आणि सरासरी १३०० रुपये बाजारभाव मिळाले.
दरम्यान काल दिनांक १३ फेब्रुवारी रोजी पुण्यात टोमॅटोला कमीत कमी ५०० रुपये, जास्तीत जास्त १२०० रुपये आणि सरासरी ८५० रुपये बाजारभाव मिळाले. कालच्या तुलनेत आज टोमॅटोचे बाजारभाव घसरलेले दिसून आले. काल पुण्याच्या मोशी बाजारात टोमॅटोला सरासरी ६५० रुपये प्रति क्विंटल बाजारभाव मिळाले.
पनवेल मध्ये क्रमांक १च्या टोमॅटोला काल सरासरी २३५० रुपये बाजारभाव मिळाले. मुंबई बाजारात सरासरी ९०० रुपये बाजारभाव मिळाले, सोलापूरला वैशाली टोमॅटोला सरासरी ५०० रुपये बाजारभाव मिळाल्याचे दिसून आले. पिंपळगाव बसवंतला ६७५ रुपये, तर नाशिकला हायब्रीड टोमॅटोला ६०० रुपये प्रति क्विंटल बाजारभाव मिळाले.












