लातूर जिल्ह्यामध्ये महिनाभरात पासून पावसाने दंडी मारल्यामुळे खरिपातील पिके वाळू लागले आहेत. ६० टक्के पेक्षा उत्पादनामध्ये अधिकची घट झाली असून नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकरी संकटात आले आहेत.
हंगाम मध्य परिस्थितीच्या सर्वेक्षणाच्या अहवालावरून जिल्हाधिकाऱ्यांनी सर्वच महसूल मंडळातील सोयाबीन पिकविमाधारक शेतकऱ्यांना नुकसान भरपाई रकमेचे पंचवीस टक्के आगाऊ रक्कम शुक्रवारी पीक विमा कंपनीस दिले आहेत.
जिल्ह्यामध्ये उशिरा पाऊस झाल्यामुळे खरीप पिकाच्या पेरण्यांना उशीर झाला आहे . पाच लाख 85 हजार 977 हेक्टरवर जिल्ह्यामध्ये पेरा झाला असून तो 98% आहे. त्या त्यात सर्वाधिक चार लाख 97 हजार 231 हेक्टर वर सोयाबीनची पेरणी झाली असून 88 हजार 746 हेक्टर वर उडीद, तुर, बाजरी, ज्वारी, कापूस ,मका , मूग अन्य पिकांची लागवड झाली आहे.
या जिल्ह्यांमध्ये आतापर्यंत सरासरी 340.6 आणि मीमी पाऊस झाला आहे. परंतु जुलै च्या शेवटी पावसाने उघडीत दिल्यामुळे खरिपातील पिके वाळू लागली आहेत . त्यामुळे उत्पादनात 60 टक्के पेक्षा अधिकची घट झाली आहे.
यादरम्यान पावसाने खंड दिल्यामुळे विविध संघटनासह, पक्षांच्या वतीने दुष्काळ जाहीर झाला असून 25% आगाऊ पिक विमा रक्कम देण्याची मागणी करण्यात आली होती . त्यामुळे जिल्हास्तरीय आढावा समितीच्या अध्यक्ष तसेच जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर घुगे यांच्या आदेशानुसार हंगाम मध्यम परिस्थितीचे सर्वेक्षण कृषी विभागाचे अधिकारी कर्मचारी विमा कंपनीचे प्रतिनिधी व स्थानिक शेतकऱ्यांनी केले होते.
त्यामध्ये पिकाच्या मागील सात वर्षाच्या सरासरी उत्पादनाच्या उत्पादन 50 टक्के पेक्षा कमी असल्याचे दिसून आले . त्यामुळे वर्षा ठाकूर घुगे यांनी सोयाबीन या पिकास संभाव्य नुकसान भरपाईच्या पंचवीस टक्के रक्कम पिक विमाधारक शेतकऱ्यांना देण्याच्या आदेश एसबीआय जनरल इन्शुरन्स कंपनी पुणे यांना दिले आहेत.
25% भरपाई मिळणारी महसूल
त्यात गातेगाव, कासारखेडा, लातूर, मुरुड, तांदुळजा, बाभळगाव, हरंगुळ बु., चिंचोली बु., कन्हेरी, औसा, भादा, किल्लारी, लामजना, मातोळा, किणी थोट, बेलकुंड, उजनी,कासारशिरसी, निलंगा, मदनसुरी, तोंडार, कारेपूर, पोहरेगाव, रेणापूर, पानगाव, पळशी, चाकूर, वडवळ नागनाथ, नळेगाव, शेळगाव, झरी बु., आष्टा, शिरुर अनंतपाळ, अहमदपूर, खंडाळी, किनगाव, शिरुर ताजबंद, हडोळती, अंधोरी, अंबुलगा बु., औराद शहाजानी, कासार बालकुंदा, हिसामाबाद, साकोळ, जळकोट, घोणसी, वलांडी, पानचिंचोली, निटूर, भुतमुगळी, हलगरा, मोघा, हेर, उदगीर, वाढवणा बु., देवर्जन, नागलगाव, नळगीर, देवणी, बोरोळ या ६० मंडळातील सोयाबीन उत्पादकांना आग्रीम मिळणार आहे.
महिनाभरात भरपाई देण्याचे आदेश…
सोयाबीनचा सर्वाधिक पेरा या जिल्ह्यामध्ये झाला असून पावसाने दिलेल्या उघडीत मुळे 50 टक्के पेक्षा अधिक उत्पादनामध्ये घट झालेली आहे . त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी पिक विमा कंपनीस सोयाबीन उत्पादकांना 25% अग्रीम द्यावी ही अग्रम महिन्याभरात धारकांच्या खात्यावर जमा करावी असे आदेश हे स्पष्ट केलेले आहेत