व्हॅलेंटाइन डेच्या निमित्ताने जगभरातून लाल गुलाबाच्या फुलांना मोठी मागणी असते . तळेगाव फ्लोरिकल्चर पार्कमधून सुमारे ४० लाख भारतीय लाल गुलाबाच्या फुलांची निर्यात झाली आहे. देशांतर्गत बाजारपेठेत ही तेवढीच फुले पाठविली आहे,असे फ्लोरिकल्चर पार्क फूल उत्पादक संघाचे सचिव मल्हारराव ढोले यांनी सांगितले
तसेच , मुकुंद ठाकर यांनी माहिती नुसार,तालुक्यातून सुमारे ३० लाख फुले निर्यात झाली . मागील वर्षीच्या तुलनेमध्ये १ एक रुपया दर यावर्षी जास्त मिळाला आहे ,असे ढोले यांनी सांगितले. या वर्षी गुलाबाच्या फुलांना १४ ते १५ रुपये दर मिळाला. .
या वर्षी साधारण ३१ जानेवारी ते १ फेब्रुवारीच्या दरम्यान फुलांच्या निर्यातीला सुरुवात झाली . पॉलिहाऊसची उभारणी तळेगाव फ्लोरिकल्चर पार्कमध्ये ७०० एकरांवर करण्यात आली आहे. यामध्ये लाल गुलाबची लागवड ४० टक्के क्षेत्रावर होते तर इतर क्षेत्रावर इतर रंगाचे गुलाबाची लागवड केली जाते , जरबेरा, कार्नेशन, रोपवाटिका आणि भाजीपाल्याचे उत्पादन देखील या ठिकाणी घेतले जाते.
या वर्षी व्हॅलेंटाइन डेसाठी फुलांची टंचाई जाणवेल असा अंदाज होता. यामुळे पहिल्या टप्प्यात निर्यातदारांकडून मागणी वाढली होती. मात्र या वर्षी हवामानाने साथ दिल्याने फुलांची मोठ्या प्रमाणावर उपलब्धता असल्याचे ढोले यांनी सांगितले.
ढोले यांचे चार एकरांवर पॉलिहाऊस आहे. . त्यापैक्की दोन एकरांवर फक्त लाल गुलाबाचे उत्पादन ते घेतात . या वर्षी त्यांच्या पॉलिहाऊसमधून ६० हजार गुलाबांच्या फुलांची निर्यात झाली असून ,स्थानिक आणि देशांतर्गत बाजारपेठेसाठी , ५० हजार फुले उपलब्ध आहे.फुलांना या वर्षी साधारण १४ ते १५ रुपये दर मिळाला आहे आणि तो मागील वर्षीच्या तुलनेत एक रुपयाने जास्त आहे.’’
मावळ तालुक्यामधील फ्लोरिकल्चर पार्कच्या पॉलिहाऊसमध्ये सुमारे २०० हेक्टर क्षेत्रावर फुलांचे उत्पादन घेतले जाते. मावळ तालुक्यातील उत्पादन आणि निर्यातीबाबत पवना फूल उत्पादक संघाचे अध्यक्ष मुकुंद ठाकर म्हणाले, ‘तसेच ‘या वर्षी विमानांच्या बुकिंगची दरवाढ, योग्य स्लॉट न मिळाल्याने आणि जीएसटी याचा फटका निर्यातीला बसला आहे.
मागील वर्षी सुमारे ४० ते ४५ लाख फुलांची निर्यात मावळ या भागातून झाली होती. या वर्षी च्या तुलनेत फुलांची निर्यात केवळ २५ ते ३० लाख इतकी झाली आहे. तर या वर्षी ५० लाख फुलांचा पुरवठा देशांतर्गत बाजारात झाला आहे. त्यास १० ते १२ रुपये दर मिळाला. एकूणच या वर्षी फुलांचे उत्पादन चांगले मिळाले परंतु निर्यात कमी झाली .’
ही आहे परदेशी बाजारपेठ
जपान, हॉलंड, ग्रीस, स्वीडन,दुबई , युरोप, ऑस्ट्रेलिया, आदी.
देशांतर्गत बाजारपेठ
मुंबई, दिल्ली, जयपूर, , सुरत , अहमदाबाद ,कोलकाता, बेंगळुरू, , आदी मोठी शहरे.












