shetkari karjmafi : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांची राजभवन, मुंबई येथे भेट घेतली. यावेळी सर्व नेत्यांनी नव्या सरकार स्थापनेचा दावा सादर केला. केंद्रीय अर्थ व कॉर्पोरेट व्यवहार मंत्री निर्मला सितारमण, गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी, चंद्रशेखर बावनकुळे, प्रफुल पटेल, रावसाहेब दानवे, अशोक चव्हाण, सुनील तटकरे, चंद्रकांत पाटील, सुधीर मुनगंटीवार व इतर मान्यवर यावेळी उपस्थित होते. यानंतर राज्यात मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस शपथ घेणार असल्याचे नक्की झाले आहे.
आज मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्यासोबतच अनेक मंत्री शपथ घेण्याची शक्यता आहे. त्यानंतर लवकरच दोनच उद्या मंत्री आपल्या खात्याचा कार्यभार स्वीकारतील. तसेच दोन दिवसांत मंत्रीमंडळाचा विस्तार होऊन सोमवारपर्यंत खातेवाटपाची प्रक्रिया चालेल. त्यानंतर मंगळवार किंवा बुधवारी नव्या मंत्रिमंडळाची पहिली बैठक होऊन त्यात अनेक लोकप्रिय निर्णय होण्याची शक्यता आहे.
त्यापैकी शेतकऱ्यांना कर्जमाफी आणि सोयाबीनला ६ हजार रुपये भाव किंवा सोयाबीन शेतकऱ्यांना प्रति क्विंटल अनुदान अशा निर्णयांचीही शक्यता असू शकते, असे प्रशासनातील जाणकारांनी सांगितले आहे. दरम्यान १६ तारखेपासून नागपूरला हिवाळी अधिवेशन सुरू होणार असून त्यापूर्वीच शेतकरी आणि सामान्य हिताच्या घोषणा मंत्रिमंडळ बैठकीत होण्याची शक्यता आहे.
दुसरीकडे लाडकी बहिण योजनेचे २१०० रुपये, कर्जमाफी इत्यादीसाठी आर्थिक तरतूद येणाऱ्या अर्थसंकल्पात होण्याची शक्यता आहे. त्यानंतरच प्रत्यक्षात शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळेल. त्यातही काही अटी आणि शर्तींची शक्यता असल्याचा अंदाज आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना कर्जमाफीसाठी अजूनही काही काळ प्रतीक्षा करावी लागणार असल्याचे बोलले जात आहे.