
Santosh deshmukh : अखेर आता एसआयटी कडून सुदर्शन घुले, विष्णू चाटे, सुधीर सांगळे, कृष्णा आंधळे, जयराम चाटे, प्रतीक घुले, महेश केदार आणि सिद्धार्थ सोनवणे अशा आठही गुन्हेगारांवर मोक्का लावण्यात आलाय दरम्यान शुक्रवारी विष्णू चाटेला खंडणी प्रकरणातून न्यायालयीन कोठडी देण्यात आली होती पण हत्येच्या प्रकरणात त्याची चौकशी करण्यासाठी त्याला एसआयटी कडून शुक्रवारी रात्री ताब्यात घेण्यात आलं होतं शनिवारी त्याला न्यायालयात हजर करण्यात आलं तिथे त्याला दोन दिवसांची सीआयडी कोठडी देण्यात आली आहे तसंच या प्रकरणात कृष्णा आंधळेचा अजूनही पोलीस शोध घेत आहेत पण आता हत्या प्रकरणातील आरोपींवर मोक्का लागल्यामुळे हा मोक्का कायदा काय आहे, हत्या प्रकरणातील आठ आरोपींवर मोक्का लागल्यानंतर आता त्यांच्यावर कोणती कारवाई होऊ शकते त्याचीच माहिती घेऊयात
मोक्का म्हणजे काय ?
मोक्का म्हणजेच महाराष्ट्र संघटित प्रतिबंधक किंवा नियंत्रण कायदा आता मोक्काच्या या फुल फॉर्म मधून आपल्याला दोन गोष्टी लक्षात येतात एक म्हणजे हा कायदा महाराष्ट्रात लागू होतो आणि या कायद्याद्वारे फक्त संघटित म्हणजेच गुन्हेगारांच्या टोळीवरच कारवाई करता येते मोक्काचा इतिहास सांगायचा तर 90 च्या दशकात वेगवेगळ्या टोळ्यांकडून महाराष्ट्रात गुन्ह्यांची मालिका सुरू झाली होती त्यामुळे या वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी 24 फेब्रुवारी 1999 ला तत्कालीन राज्यपाल पीसी अलेक्झांडर यांनी मोक्का बाबत एक अध्यादेश काढला त्यानंतर तत्कालीन गृहमंत्री गोपीनाथ मुंडे यांनी मोक्का बाबतच विधेयक राज्य विधिमंडळात मांडलं. विधिमंडळाच्या मंजुरीनंतर मोक्का म्हणजेच महाराष्ट्र कंट्रोल ऑफ ऑर्गनाईज क्राईम हा कायदा राज्यात लागू झाला आजवर या कायद्यांतर्गत अनेक छोट्या-मोठ्या गुन्हेगारी टोळ्यांवर कारवाई करण्यात आली आहे खंडणी, खंडणीसाठी गैरकृत्य, हप्ता वसुली, सुपारी देणं, हत्या करणं, अमली पदार्थांची तस्करी करणं, घुसखोरी दरोडा या आणि अशा गंभीर गुन्ह्यांबाबत मोक्का अंतर्गत कारवाई करण्याची तरतूद आहे पण आधी सांगितल्याप्रमाणे संघटित प्रकारच्या गुन्हेगारी विरोधातच मुक्का लावता येतो याचाच अर्थ मोक्का हा फक्त एका व्यक्तीवर लावता येत नाही त्यासाठी दोन किंवा त्यापेक्षा जास्त गुन्हेगारांची टोळी गुन्ह्यात सहभागी असणे गरजेचे आहे यात एक विशेष अट म्हणजे या टोळीतील आरोपींपैकी किमान एकावर तरी गेल्या दहा वर्षात दोन किंवा त्यापेक्षा जास्त गुन्ह्यात चार्जशीट दाखल असावी आणि कोर्टाने त्याची दखल घेतलेली असावी, मोक्का लावण्यासाठी ही तरतूद बंधनकारक आहे. जे गुन्हेगार आर्थिक फायद्यासाठी किंवा इतर कोणत्याही कारणासाठी टोळीनं गुन्हा करतात त्यांच्यावर मोक्का लावण्याची मुभा पोलिसांना देण्यात आली आहे शहरी भागात सहाय्यक पोलीस आयुक्त तर ग्रामीण भागात पोलीस उपधीक्षक मोक्का बाबत तपास करण्याचे अधिकार देण्यात आलेत त्यांच्याकडून गुन्हेगारी टोळीचा अहवाल तयार करून टोळीवर मोक्का लावण्यासाठीचा प्रस्ताव तयार केला जातो त्यानंतर पोलीस महानिरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्याकडे मोक्का लावण्यासाठी परवानगी अर्ज पाठवला जातो या अर्जासोबत टोळीतील गुन्हेगारांच्या गेल्या दहा वर्षातील गुन्ह्यांचा सगळा तपशील दिलेला असतो. पोलीस महानिरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्याकडून या अर्जाची छानणी केली जाते आणि त्यांच्याकडून मोक्का लावण्याची परवानगी मिळाल्यावरच संबंधित टोळी विरोधात मोकांतर्गत कारवाई होऊ शकते.
आरोपीवर मोक्काअंतर्गत कोणती कारवाई होणार..
आता ही सगळी प्रक्रिया पूर्ण झाल्यामुळे आता संतोष देशमुख प्रकरणातील आठही आरोपींवर मोक्का लावण्यात आल्याचं सांगितलं जातंय एकदा का मोक्का लागला की त्यातल्या शिक्षेच्या तरतुदी ही आहेत मुख्य म्हणजे मोक्का लागल्यावर आरोपींना अटकपूर्व जामीन मंजूर होत नाही तसंच साध्या गुन्ह्यांमध्ये पोलिसांना चार्जशीट फाईल करण्यासाठी 90 दिवस म्हणजेच तीन महिन्यांची मुदत असते पण मोक्का अंतर्गत पोलिसांना चार्जशीट फाईल करण्यासाठी सहा महिने म्हणजेच दुप्पट कालावधी येतो या दुप्पट कालावधीमुळे आरोपींची कसून चौकशी करून त्यांनी केलेल्या वेगवेगळ्या गुन्ह्यांची माहिती पोलिसांना घेता येते आणि त्यांना जास्तीत जास्त शिक्षा देण्यासाठी एक स्ट्रॉंग चार्जशीट बनवता येते. तसंच मोक्का कायद्यानुसार असलेल्या गुन्ह्याची सुनावणी विशेष न्यायालयात पार पडते या न्यायालयातील न्यायाधीशांची निवड हायकोर्टच्या मुख्य न्यायाधीशांच्या सल्ल्यानं राज्य सरकारकडून केली जाते आता मोक्का कायद्यात वेगवेगळ्या गुन्ह्यांसाठी वेगवेगळ्या शिक्षांची तरतूद करण्यात आली आहे. गुन्हेगारांच्या एखाद्या व्यक्तीची हत्या केली असेल तर अशा वेळी गुन्हेगारांना मृत्युदंड किंवा जन्मठेपेची शिक्षा सुनावली जाते तसंच इतर गुन्ह्यात पाच वर्ष किंवा जन्मठेपेची शिक्षा सुनावली जाऊ शकते यासोबतच आरोपींना एक लाख ते पाच लाखांपर्यंत दंडही केला जाऊ शकतो तसंच आरोपींची मालमत्ता देखील जप्त करण्याची मुभा मोक्का कायद्यानुसार पोलिसांना मिळते. त्यामुळे एकंदरीतच मोक्का कायद्यामुळे टोळीतल्या गुन्हेगारांना कठोरातील कठोर शिक्षा देण्यासाठी मदत होते.
आता संतोष देशमुखांच्या मारेकरांवर मोक्का लावला असला तरी तो मोक्का न्यायालयात टिकवणं महत्त्वाचं आहे या मारेकऱ्यांवर मोक्का का लावण्यात आला त्यांनी केलेली संघटित गुन्हेगारी पोलिसांना न्यायालयात सिद्ध करावी लागेल. फक्त चार्जशीट फाईल करण्यासाठी जास्त वेळ मिळावा या कारणामुळे त्यांच्यावर मोक्का लावल्याचा युक्तिवाद न्यायालयात स्टँड होत नाही असं काही कायदेतज्ञांचे मत आहे. पण मोक्का लागल्या लागल्या लगेचच आरोपींवर कठोर कलम लावून चार्जशीट फाईल करण्यासाठी पोलिसांचे प्रयत्न सुरू होतात आता आता या प्रकरणात स्वतः मुख्यमंत्री आणि गृहमंत्री असलेल्या देवेंद्र फडणवीसांनी मोक्का लावण्याचं आश्वासन दिल्यामुळे या आरोपींवरचा मुक्का सिद्ध करण्यासाठी पोलीस सबळ पुरावे सादर करतील असं काही वकिलांचं मत आहे. मोक्का कायद्यात हत्येतील आरोपींना फाशी किंवा जन्मठेपेच्या शिक्षेची तरतूद असल्यामुळे संतोष देशमुखांच्या आरोपींना नेमकी कोणती शिक्षा होणार त्यासाठी न्यायालयात पोलीस आणि सरकारी वकिलांकडून कसा युक्तिवाद केला जाणार हे पाहणं आता महत्त्वाचं असणार . आहे आता या प्रकरणात ला आका म्हणून ज्याच्यावर आरोप होत आहेत त्या वाल्मिक कराडवर हत्येचा गुन्हा दाखल झाला नसला तरी त्याला खंडणीच्या गुन्ह्याखाली अटक करण्यात आली आहे आता मोक्का हा हत्येच्या प्रकरणात दोषी असलेल्या आरोपींवर लावण्यात आल्यामुळे अजूनपर्यंत वाल्मिक कराडवर मोक्का लावण्यात आलेला नाही वाल्मिक कराडला हत्येच्या प्रकरणात सह आरोपी करण्याची मागणी जोर धरते तसेच टोळी कडून मागण्यात आलेल्या खंडणीच्या प्रकरणातही मोक्का अंतर्गत कारवाईची तरतूद आहे पण या प्रकरणात त्याला किती कठोर शिक्षा होणार हा मोठा मुद्दा आहे त्यामुळे त्याला हत्या प्रकरणात सह आरोपी करण्यासाठी पोलिसांना सवळ पुरावे न्यायालयात सादर करावे लागणार आहेत. संतोष देशमुख यांच्या हत्येत वाल्मिक कराड दोषी आढळला तर त्याच्यासह इतर आरोपींवर मोक्का अंतर्गत कारवाई केली जाईल असा शब्द स्वतः फडणवीसांनी अधिवेशनात दिल्यामुळे कराड वरचा हत्येचा आरोप सिद्ध झाला तर त्याच्यावरही हत्येच्या प्रकरणात मोक्का लागू शकतो असं सांगितलं जातंय तुम्हाला काय वाटतं हत्या प्रकरणातल्या आरोपींवर मोक्का लागल्यामुळे त्यांना फाशी होनार की जन्मठेप,की इतर कोणती शिक्षा, वाल्मिक कराडवर हत्येच्या प्रकरणात मोक्का लागणार का याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा.