पीकविमा अर्जासाठी मुदत वाढ ,जाणून घ्या किती दिवस वाढली मुदत ..

शेती करताना शेतकऱ्यांना वेगवेगळ्या अडचणींना सामोरे जावे लागते . यासाठी पीक विमा योजना सरकारने आणली आहे एक रुपया भरून या योजनेमध्ये सहभाग घेता येत आहे. यावर्षी २ लाख ८४ हजारांवर खरीपसाठी मुदतीमध्ये अर्ज आले आहेत. गेल्यावर्षीचा त्यामुळे विक्रम मोडला आहे. त्यातच शासनाने आता ३१ जुलैपर्यंत मुदत वाढवण्यात आली आहे विमाधारक चार लाखांपर्यंत अर्जांची संख्या जाण्याचा अंदाज व्यक्त होत आहे.

शेती करताना अनेक अडचणी शेतकऱ्यांना येतात. त्यामुळे पीक उत्पादनालाही फटका बसतो. यासाठी सरकारने पीक विमा योजना सुरू केली आहे . यामध्ये गारपीट,पावसातील खंड, ढगफुटी, चक्रीवादळ ,अतिवृष्टी, दुष्काळ, आदी कारणाने पिकाचे नुकसान झाल्यामुळे विमा उतरविलेल्या पिकांसाठी भरपाई देण्यात येते. या योजनेसाठी पूर्वी शेतकऱ्यांना ठराविक रक्कम भरावी लागत होती. तर केंद्र शासन व राज्य शासनाचाही यामध्ये वाटा असायचा; पण राज्य शासनाने मागील वर्षीच्या खरीप हंगामापासून शेतकऱ्यांना एक रुपयांत पीक विमा देण्याचा निर्णय घेतला आहे.

या योजनेला जिल्ह्यात मागील वर्षी शेतकऱ्यांचा मोठा प्रतिसाद मिळाला होता. सुमारे पावणे तीन लाखांहून अधिक अर्ज करण्यात आले होते . यामध्ये माण तालुक्यातील सर्वात जास्त शेतकरी या योजनेत सहभागी झाले होते. त्यातच बरोबर मागील वर्षी दुष्काळ पडल्यामुळे लाखो शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळण्यास मदत झाली. गेल्यावर्षीच्या खरीप हंगामातील शेतकऱ्यांच्या खात्यावर नुकसानीचे पैसे जमा होत आहेत. त्यामुळे या वर्षी देखील शेतकरी विमा उतरवू लागले आहेत. यासाठी अंतिम मुदत हि १५ जुलै होती.या मुदतीमध्ये एक लाख चार हजार शेतकऱ्यांनी २ लाख ८४ हजार विविध पिकांसाठी अर्ज जमा केले होते.पीक विम्यासाठी मुदत आता ३१ जुलैपर्यंत वाढविण्यात आलेली आहे. त्यामुळे सहभागी होणाऱ्या शेतकऱ्यांचा आकडा वाढणार आहे. कारण, १५ दिवस आणखीन शेतकऱ्यांना पीक विम्यासाठी अर्ज करू शकता .

या मुदतीत २ लाख ८४ हजार अर्ज जमा झाले आहेत . आता विमा भरण्याची मुदत ३१ जुलैपर्यंत वाढवली आहे. शेतकऱ्यांनी एक रुपया भरुन या योजनेचा लाभ घ्यावा.यासाठी अधिसुचित केलेल्या पिकांचा विमा बॅंका, , महा ईसेवा केंद्र,विकास सेवा सोसायटी , विमा प्रतिनिधींकडे अर्ज भरावा. –
भाग्यश्री फरांदे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *