शेतातील बांधावर वा काही गुंठे भागात फणस लावल्यास फायदेशीर ठरू शकते. एका झाडापासून तीन ते चार क्विंटल फणस निघतात.
फणस म्हटले की डोळ्यासमोर येते कोकणातील फणसशेती. पण कष्टाच्या जीवावर विदर्भाच्या जमिनीतही फणसाची शेती करता येऊ शकते हे एका शेतकऱ्याने सिद्ध केलंय. पारंपरिक पिकासोबतच वेगळी वाट आणि परीश्रमामध्ये सातत्य ठेवल्यावर काय होऊ शकते याचे उदाहरण यवतमाळच्या पुसद तालुक्यातील चिलवाडी शिवारात येथे पहावयास मिळते. बंडू जाधव या शेतकऱ्याने फणस शेती केली आणि बारा गुंठ्यातून भरघोस उत्पन्नही घेतलं आहे. जाधव यांनी आपल्या शेतात लागवड केलेल्या 30 झाडांमधून ते दरवर्षी सव्वा ते दीड लाखांपर्यंत उत्पन्न मिळवतात.
बंडू जाधव यांची 15 एकर शेती असून 12 गुंठ्यांत पंधरा वर्षांपूर्वी त्यांनी आंध्र प्रदेशातील फणस रोपांची लागवड केली. लागवडीनंतर पाच वर्षांनी त्याला फळे येऊ लागली. दरम्यान आंतरपीक म्हणून सोयाबीनचे उत्पन्न देखील घेतले तर आता झाडे मोठे झाल्यानंतर त्यात गुरांसाठी वैरण घेतल्या जाते. या फणस झाडांना बुरशीनाशक फवारणी शिवाय कुठलाही खर्च नाही. केवळ झाडांची फांदी छाटणी ते करतात. सद्यस्थितीत खोडांपासून फणसांची ही झाड फळांनी लगडली आहेत.
फणस हे कोरडवाहू फळझाड असून फणसाची झाडाला कुठलेही रासायनिक खते आणि कीटकनाशके न फवारणी करता वाढलेली दिसतात. फणसाचे पीक उष्ण कटिबंधातील हवामानात वाढणारे आहे. बंडू जाधव यांनी भौगोलिक स्थिती आणि पोषक वातावरणाचा अभ्यास करुन ही झाडे 15 वर्षांपूर्वी लावली मागील दहा वर्षापाऊसून उत्त्पन्न येण्यास सुरुवात झाली.
शेतकरी खरिपात सोयाबीन, कापूस, तूर तर रब्बी हंगामात गहू, हरबरा हे पिके घेतात. मात्र शेतातील बांधावर वा काही गुंठे भागात फणस लावल्यास फायदेशीर ठरू शकते. एका झाडापासून तीन ते चार क्विंटल फणस निघतात यासाठी त्यांना पुसद महागाव आर्मी यवतमाळ नांदेड येथील व्यापारी स्वतःच शेतामध्ये येऊन फणस खरेदी करतात त्यामुळे त्यांना मार्केट शोधण्याची कुठेच आवश्यकता नाही.
source:- abplive