पंजाबराव डख यांनी यंदाच्या मान्सून बाबत दिली हि माहिती, वाचा सविस्तर.

dank havaman

दि. 24 एप्रील ते 2 मे सर्वानी विजा, गारपीठ, वारे ,स्वताचे, पिकांचे, पाळीव प्राण्यांची काळजी घ्यावी . – पंजाब डख

ज्यांनी गारपिठ कसी होते कधी पाहिली नाही त्यांना पहायला दिसेल.

पूर्व-सुचना
राज्यातील सर्वानी 24 एप्रील पासून 2 मे दहा दिवस विजा वारे पाउस गारपिठ या पासून स्वःतची पाळीव प्राणी, , हळद , इतर पिके काळजी घ्यावी कारण 24 एप्रील पासून राज्यात भाग बदलत 2 मे पर्यंत दहा दिवस पाउस पडणार आहे तरी अंदाज लक्षात घेउन शेतीचे कामे करून घ्यावी

पूर्वविदर्भ  . दि 21,22,23,24,25,26,28,29, तुरळक भागात दररोज भाग बदलत पाउस काही ठिकाणी वारा तर कुठे गारपिठ असेल . 

उत्तर महाराष्ट्र दि .22,26,27,28,29,30 या तारखेत भाग बदलत तुरळक ठिकाणी कुठे  वारे तर काही भगात गारपिठ तर कुठे पाउस पडेल . 

मराठवाडा दि . 25,26,28,29, 30 या तारखेत भाग बदलत काही ठिकाणी गारपिठ ,वारा ,विजा, पाउस असेल . 

दक्षिण व प . महाराष्टू दि .26,27,28,29,30 दरम्याण काही ठिकाणी गारपिठ वारे विजा पाउस असेल . 

प-विदर्भ– दि .25,26,26,28,29,30 या तारखेत भाग बदलत काही भागात गारपिठ . कुठे वारे कुठे पाउस असेल .

मान्सूनच आगमन तसेच यावर्षी देखील मान्सूनच आगमन हे पूर्वेकडूनच होणार असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले आहे. म्हणजेच यंदाही मान्सून समाधानकारक राहणार आहे. जरी प्रसारमाध्यमांमध्ये सध्या एलनिनो बाबत चर्चा रंगलेल्या असल्या तरी देखील डक यांनी याचा आपल्या महाराष्ट्रातील मान्सून वर कोणताच विपरीत परिणाम होणार नाही असा दावा यावेळी केला आहे.

ज्याप्रमाणे 2022 मध्ये समाधानकारक पाऊस झाला तसाच पाऊस यंदा देखील मान्सून काळात पडणार असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले आहे. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार आठ जून 2023 ला यंदा मान्सूनच आगमन होणार आहे. आगमनानंतर 22 जून पर्यंत संपूर्ण राज्यात पाऊस पडणार आहे.

यानंतर जून महिन्यातील शेवटच्या आठवड्यापासून खरीप हंगामातील पेरणीच्या कामाला सुरुवात होणार आहेत. बहुतांशी शेतकऱ्यांच्या पेरण्या जूनमध्येच होतील मात्र ज्या शेतकऱ्यांच्या राहून जातील त्यांच्या पेरण्या 15 जुलै पर्यंत होतील असे देखील त्यांनी यावेळी बोलताना नमूद केलं.

शेवटी अंदाज आहे. वारे बदल झाला की वेळ ,ठिकाण, दिशा ,बदलते माहीत असावे.

नाव : पंजाब डख
हवामान अभ्यासक
मु.पो. गुगळी धामणगाव ता . सेलू जि. परभणी 431503 (मराठवाडा)
दि 21/ 04/2023

source:- shetkaribatmya

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *