छत्तीसगडच्या शेतकऱ्यांने औषध फवारणीसाठी घेतले चक्क हेलिकॉप्टर; वाचा, सविस्तर..

छत्तीसगडच्या शेतकऱ्यांने औषध फवारणीसाठी घेतले चक्क हेलिकॉप्टर; वाचा, सविस्तर

छत्तीसगडमधील बस्तर या नक्षलग्रस्त परिसरातील कोंढवा  जिल्ह्यामधील डॉक्टर राजाराम त्रिपाठी हेलिकॉप्टर खरेदी करणारे राज्यातील पहिले शेतकरी आहेत. त्यांनी  हॉलंडच्या रॉबिन्सन कंपनीशी सात कोटी रुपये खर्च करून हेलिकॉप्टरचा करार केला आहे. वर्षभरात त्यांना R-44  मॉडेलचे चार सीटर हेलिकॉप्टर मिळेल.

डॉक्टर राजाराम त्रिपाठी यांनी सांगितले की, त्यांचे कुटुंब मूळचे उत्तर प्रदेशातील प्रतापगड जिल्ह्यामधील आहे. त्यांच्या आजोबा 70 वर्षांपूर्वी छत्तीसगडमधील बस्तर येथे आले होते. राजाराम यांनी एलएलबी अर्थशास्त्रात  एमए  आणि तीन संशोधन विषयांत डॉक्टरेट केले आहे.

राजाराम त्रिपाठी हे  माँ दंतेश्वरी हर्बल ग्रुप चालवतात .ते पांढरी मुसळी ,काळी मिरी, औषधी वनस्पतींची लागवड करतात. त्यांनी संपूर्ण देशात वेगळी ओळख निर्माण केली आहे. अलीकडेच त्यांना सुमारे 400 आदिवासी कुटुंबासह हजार एकरामध्ये यशस्वी सामूहिक शेतीसाठी पुरस्कार देण्यात आला आहे. तसेच त्यांना सेंद्रिय शेतीसाठी देखील गौरवण्यात आले आहे. त्याचबरोबर आपल्या शेतीत आणखीन एक इतिहास रचत ते सात कोटी खर्च करून हेलिकॉप्टर खरेदी करणार आहेत.

इंग्लंड व जर्मनी मध्ये हेलिकॉप्टर च्या साह्याने औषध फवारणी व खते फवारणी करत असल्याचे त्यांनी पाहिले व त्याचा परिणाम देखील अधिक चांगल्या पद्धतीने होत असल्याचे त्यांच्या लक्षात आले व त्यामुळे आपल्या शेतीसह आजूबाजूच्या शेती क्षेत्राची हेलिकॉप्टर द्वारे काळजी घेण्याचे त्यांनी ठरवले व त्यांनी हेलिकॉप्टर घेण्याचा निर्णय घेतला.

ते एक कस्टमाईज हेलिकॉप्टर बनवत आहे .जेणेकरून त्यामध्ये मशीनही बसवता येते. हेलिकॉप्टर मधून औषध फवारणी करून पिकांना पुरेशा प्रमाणात औषध टाकता येते .त्यामुळे पिकांची नुकसान होत नाही.

25 कोटी ची वार्षिक उलाढाल

त्यांची शेती व दंतेश्वरी हरबल ग्रुप मधून त्यांच्या फॉर्मची वार्षिक उलाढाल सुमारे 25 कोटी रुपये इतकी होते.त्यांच्यासोबतच आजूबाजूच्या भागातील आदिवासी शेतकरी, प्रगतशील शेतकऱ्यांच्या श्रेणीत आले आहेत. त्यांच्याकडून वनौषधींचे केले जात आहे .यामध्ये पांढरी मुसळी ,बस्तरच्या औषधी वनस्पतींचा ही समावेश आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *