ग्रामीण भागातील शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची आणि शेतकरी योजनेची आतुरतेने वाट बघत होते अशी योजना म्हणजे ”गाव तिथे गोदाम योजना”.गाव तिथे गोदाम योजनेच्या संदर्भातील एक अतिशय महत्त्वाचा जीआर 15 जानेवारी 2024 रोजी निर्गमित झाला आहे. एकंदरीत आपण जर पाहिलं तर ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना गोदामाची अतिशय मोठ्या प्रमाणावर आवश्यकता असते शेतमालाची होणारी नासाडी असेल तसेच कमी भावाच्या वेळेस शेतमालाची साठवणूक करणे असेल अशा सर्व गोष्टींमध्ये शेतकऱ्यांना ही गोदामे अतिशय महत्त्वाची ठरतील.
अनेक शेतकऱ्यांना धान्य साठवण्याची अडचण असते. सरकारने हीच अडचण लक्षात घेऊन गाव तिथे गोदाम योजना सुरू केली आहे . काही शेतकरी साठवणूक व्यवस्था नसल्यामुळे शेतातून काढून आणलेला माल थेट बाजारात विक्रीसाठी नेतात व ज्यामुळे संबंधित शेतमालाचे किंवा धान्याचे दर घसरलेले असतील तर शेतकऱ्यांना नुकसान होते.याउलट दरवाढ झाल्यानंतर शेतकरी आपल्याला हवा तेव्हा स्वतःचा माल बाहेर विक्रीसाठी काढू शकतात.
या योजनेसाठी समिती गठित होणार..
गाव तिथे गोदाम या योजनेच्या अभ्यास समितीच्या अहवालातील सर्व कक्ष मुद्दे विचारात घेऊन सदर योजना प्रत्यक्षात कार्यरत होण्यासाठी गाव तिथे गोदाम योजनेचे प्रारूप तयार करून शासनास शिफारस करणे करिता खालील प्रमाणे समिती संघटित करण्यात येत आहे..

सदर समितीने योजनेचे प्रारूप तयार करून शासनास दोन महिन्यात सादर करावेत.सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या या https://gr.maharashtra.gov.in संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला आहे.












