Soybean bajarbhav: या आठवड्यात सोयाबीनला कसा बाजारभाव मिळतोय?

soybean bajarbhav: सोयाबीनच्या सरकारी हमीभाव खरेदीची मुदत सहा दिवसांनी वाढवल्यानंतर बाजारात सोयाबीनच्या बाजारात १ ते दीड रुपयांनी वाढ झाल्याचे दिसून आले. लातूर बाजारात सोमवारी आठवड्याच्या सुरुवातीला सोयाबीनचे जास्तीत जास्त बाजारभाव ४२०० आणि सरासरी बाजारभाव ४१०० रुपयांवर पोहोचले होते. इतरही महत्त्वाच्या बाजारात सोयाबीनचे बाजारभाव अल्पसे वाढल्याचे दिसून आले.

मंगळवारी हिंगोली खानेगाव नाका बाजारात सोयाबीनला सरासरी ३८०० रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव मिळाला. भोकरदन तालुक्यातील पिंपळगाव रेणुकाई बाजारात सरासरी ४ हजाराचा बाजारभाव मिळाला. परभणी जिल्ह्यातील जिंतूरमध्ये सोयाबीनला सरासरी ४ हजाराचा प्रति क्विंटल बाजारभाव मिळाला. लातूर जिल्ह्यातील अहमदपूर बाजारात सोयाबीनला सरासरी ३९४१ रुपये प्रति क्विंटल बाजारभाव मिळाला. निलंगा बाजारात ४ हजाराचा बाजारभाव मिळाला. जालना बाजारात ४ हजार, अकोला बाजारात ४ हजार ४० रुपये, अमरावती बाजारात ३९०० रुपये सरासरी प्रति क्विंटल बाजारभाव मिळाला.

मंगळवारी नाशिक जिल्ह्यातील लासलगाव, विंचूर बाजारात सोयाबीनला चांगला बाजारभाव मिळाल्याचे दिसून आले. लासलगाव बाजारात ३०४ क्विंटल सोयाबीन आवक होऊन कमीत कमी ३ हजार, तर सरासरी ४ हजार २५ रुपये बाजारभाव मिळाला. लासलगावच्या विंचूर उपबाजारात ४ हजार २१ रुपये बाजारभाव प्रति क्विंटल मिळाला. निफाड बाजारात ४ हजार ८० रुपये बाजारभाव मिळाला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *