कशी होते मधमाश्याच्या पोळ्याची निर्मिती , वाचा सविस्तर …

मधमाशा या समूह करून राहतात. मधमाश्यांच्या एका वसाहतीमध्ये काही नर माश्या तर अनेक म्हणजेच सुमारे दहा हजार कामकरी माश्या आणि एक राणीमाशी, असते . एक वसाहत ही या संपूर्ण घटकांची मिळून तयार होते. या वसाहतीमध्ये राणी, नर व कामकरी माश्यांना प्रत्येकाचे काम नेमलेले असते.

राणी माशी
– एका वासाहतीमध्ये केवल एकच राणी माशी असते. ही आकाराने सर्वात मोठी असून वसाहतीची प्रमुख असते.
– ही माशी काम करी माश्यानंपेक्षा आकाराने दुप्पट असते.
– राणी माशीला दंश करणारा काटा नसतो. हिचे आयुष्य दोन ते तीन वर्ष असते.
– राणी माशीला केवळ अंडी घालावयाचे काम असते. ती दिवसाला पाच ते हजार अंडी घालते.
– फलित आणि अफलित अशा दोन प्रकारची अंडी राणी माशी घालते. फलित अंड्यापासून राणी आणि कामकारी
माश्यांच जन्म होतो. तर अफलित अंड्यापासून नर माश्यांचा जन्म होतो. फलित अंड्यापासून जन्माला येणाऱ्या
अळीला राणी माशी करावयाचे असते. अशा आळीनसाठी भरपूर व पौष्टिक अन्नाचा पुरवठा कायम चालू
असून यालाच ‘रॉयल जेली’असे म्हणतात.
– रॉयल जेली पासून कामकरी माशीच्या डोक्यातील विशिष्ट ग्रंथीत तयार होते.

नर माशी
– नर माशी ही आकाराने राणीमाशी पेक्षा लहान आणि कामकरी माश्यानंपेक्षा मोठी असते.
– राणीमाशीप्रमाणेच नर माश्यांना देखील दंश करणारा काटा नसतो.
– नरमाशी हि राणी माशीने घातलेल्या अफलित अंड्यांमधून जन्माला येते.नर रंगाला काळे असतात.
– एका वसाहतीमध्ये 200 ते 500 नर असतात.
– नर माश्यांचे काम केवळ राणीमाशी सोबत मिलन करणे आणि मतपेटीत हवे असणारे तापमान निर्माण करणे हे आहे.
– मिलनानंतर नरमाशी मृत्युमुखी पडते. नर माशीचे आयुष्य एक ते दोन महिने असते.

कामकरी माश्या
– या आकाराने सर्वात लहान असतात.
– कामकरी मश्या ह्या राणीमाशी ने घातलेल्या फलित अंड्यांपासून निर्माण होतात.
– या माश्यांना विषारीकाटा असतो. शत्रूपासून पोळ्याचे संरक्षण करण्याचे काम प्रामुख्याने काम करी मश्या करतात.
-आळ्या या फलित अंड्यामधून निर्माण झालेल्या आळ्यान सारख्याच असून त्यातील एका अळीला पौष्टिक खाद्य
(रॉयल जेली) दिल्यामुळे तिची वाढ इतर कामकरी माश्यांच्या दुप्पट होते. अशा प्रकारे राणी माशी जन्माला येते.
परंतु उर्वरित अळ्यांनाची वाढ दुय्यम दर्जाचे व अपुरे अन्न दिल्यामुळे होत नाही. अशा अळ्यांपासून कामकरी
माश्या तयार होतात.
– राणी माशी प्रमाणेच कामकरी माश्या असतात. परंतु त्या आकाराने लहान असल्यामुळे त्यांची जननेंद्रियांची वाढ पूर्ण
झालेली नसते. त्यामुळे त्या नरा सोबत संयोग करू शकत नाही.
– कामकरी माश्यांचे आयुष्मान चार आठवडे ते सहा महिने इतके असते.
– कामकरी माश्या वसाहतीमध्ये महत्वाची भूमिका बजावतात. त्या वसाहतीमध्ये अनेक प्रकारची कामे करतात.

कामकरी माश्यांचे कार्य
– पोळे बांधणे.
– मकरंद परागकण गोळा करणे.

– नवीन राणी माझी तयार करणे व तिची काळजी घेणे.
– पाणी, परागकण, मकरंद इत्यादी अन्नासाठा कुठे आहे हे शोधून काढणे.
– पोळ्यांचे संरक्षण करणे.

मधमाशी पालनातून मिळणारे उत्पादने
मेण
– मधमाशीपालनातून मेणांचे उत्पादन मिळते. चर्म उद्योग तसेच सौंदर्य प्रसाधनांमध्ये या मेणांचा वापर केला जातो. मेणबत्ती बनविण्यासाठी मधमाशीच्या मेणाचा उपयोग होतो.

रॉयल जेली
– रॉयल जेली हा राणीमाशीला दिले जाणारा मुख्य अन्नस्त्रोत असतो. राणीमाशीला व तरुण अळी अवस्थेतील पिलवळीस हे भरवले जाते. रॉयल जेली हि मानवी आरोग्याच्या दृष्टीने उपयुक्त आहे.

बी व्हेनम
– यांचा उपयोग संधिवाताच्या उपचारासाठी केला जातो.

पराग
– मधमश्या फुलांवरून पराग गोळा करतात. त्यांचा उपयोग त्यांच्या अन्नामध्ये होतो. परागामध्ये प्रथिनांचे प्रमाण खूप जास्त असते. परागाचा उपयोग औषध निर्मिती तसेच प्रथिनांच्या पावडर मध्ये केला जातो.

प्रोपोलीस
– हा पदार्थ कामकरी माश्या झाडांमधून सवणाऱ्या डिंकापासून मिळवतात. वसाहतीतील डागडुजीच्या कामांमध्ये केला जातो. प्रोपोलीस हा पदार्थ औषधी गुणधर्मयुक्त असतो. जखमा भरून येण्यासाठी त्याचा वापर केला जातो.

मधमाश्यांसाठी उपयुक्त वनस्पती.. 
– झेंडू ,ॲस्टर , गुलाब ,टोमॅटो, वांगे, मोहरी ,कांदा ,मुळा ,गाजर फुलकोबी, कोबी ,भेंडी ,कापूस चना ,वाटाणा ,मोहरी , जवस ,तीळ सूर्यफूल ,मूग ,तूर ,दोडके, कोथंबीर ,काकडी ,भोपळा, करंज, साल ,निलगिरी ,सुबाभुळ वेडीबाभूळ , बेल ,गुलमोहर ,रिठा, आवळा ,कवट ,निरगुडी ,अडुळसा ,शिसम ,चिंच ,पेरू ,मोसंबी, संत्रा ,बोर ,आंबा ,लिंबू , जांभूळ, शेवगा ,कडुलिंब इत्यादी.

Leave a Reply