Cultivation of figs : अंजिर लागवडीतून या शेतकऱ्यांने कसे कमवले भरघोस उत्पन्न , वाचा सविस्तर …

परभणीपासून पंधरा किलोमीटर वरील सिंगणापूर या गावाची ओळख भाजीपाला उत्पादक अशी आहे. येथील शेतकरी लिंबू ,पपई, आवळा, केळी आधी सह ऊस ही घेतात.जायकवाडी धरणाच्या डाव्या कालव्याच्या पाण्यावर गावातील शेतकरी अवलंबून असतात . मात्र पाणीसाठा कमी झाल्याने अडचणी निर्माण होतात. काहींनी संरक्षित सिंचनाची शेततळ्याच्या माध्यमातून व्यवस्था केली आहे. येथील शेतकऱ्यांचा कल कमी पाण्यात येणाऱ्या फळ पिकांकडे असून तुषार, ठिबक आदींचाही ते वापर करतात.

अंजिर पिकातून मिळवले उत्पन्न… 

गावातील माणिकराव खिल्लारे यांची जमीन दहा एकर हलकी ते मध्यम प्रकारची आहे. यांची दोन विहिरी देखील आहे. ऊस, भाजीपाला व केशर आंब्याची काही झाडे सुमारे पाच एकरात आहेत. त्यांचा मुलगा अशोक याने बी.एस्सी.(कृषी) पदवी संपादन केली आहे. वडिलांसोबत तेही पूर्णवेळ शेती करतात. पूर्वी पाऊस खात्रीशीर पडायचा.

त्या वेळी मुबलक पाणी उपलब्ध राहायचे. त्यामुळे भाजीपाला, ऊस या पिकांवर भर होता . परंतु अलीकडील वर्षात पाऊस कमी असल्यामुळे  सिंचनस्रोतांना पाणी उपलब्ध राहत नाही. भाजीपाल्यांचे नीचांकी, उसाचे एकरी दहा टनाच्या दरम्यान मर्यादित उत्पादन घसरणारे दर या समस्या आहेत. त्यामुळे खिल्लारे यांनी कमी पाण्यात येणाऱ्या व चांगले दर देण्याची क्षमता असलेल्या पिकांच्या शोधात होते. त्यातून अंजिराचा पर्याय योग्य वाटू लागला. त्यांची शेती यशस्वी केल्याची उदाहरणे ही गावातील काही शेतकऱ्यांची समोर होती. अंजीर शेतीचे नियोजन

खिल्लारे यांनी वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातून अंजिराच्या दिनकर वाण्यांची रोपे आणून 2017 मध्ये सव्वा एकरात पंधरा बाय बारा फूट अंतरावर लागवड केली. अभ्यासपूर्ण व्यवस्थापनातून हा प्रयोग यशस्वी झाला. सध्या अंजीर ची लागवड सव्वादोन एकरात आहे.

ऑगस्टच्या दुसऱ्या आठवड्यात मध्ये किंवा सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात छाटणी केली जाते. त्यानंतर शेणखत एकरी पाच ट्रॉली याप्रमाणे वापर करण्यात येतो. फळ हंगाम डिसेंबर ते मे-जून पर्यंत असतो. अधिक उत्पादन जानेवारी ते मार्च पर्यंतच्या कालावधीत मिळते. जून पर्यंत उत्पादनाचे नियोजन पाण्याच्या उपलब्धतेनुसार केले जाते. फळ तोडणी हे कुटुंबातील सर्व सदस्य मजुरांच्या मदतीने करतात. त्यानंतर प्रतवारी व क्रेटमध्ये कागद व अंजिरची पाने पसरून फळे भरली जातात.

विक्री व्यवस्था केली विकसित… 

सध्या एकरी 25 ते 30 क्विंटल उत्पादन मिळत आहे. दररोज सकाळी माणिकराव वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या प्रवेशद्वाराजवळ बसून अंजिराची थेट ग्राहक विक्री करतात. अर्थात, विक्री-मार्केटिंगची जबाबदारी अशोक यांच्याकडे आहे. त्यांनी कृषी विद्यापीठ, कृषी विभाग व अन्य ग्राहकांचे व्हाट्सअप ग्रुप तयार केले आहेत.

अंजीर टप्प्याटप्प्याने विक्रीवर काढणीयोग्य होते. त्यानुसार ग्रुप द्वारे ‘मेसेज’ देण्यात येतो. अशोक ‘ऑर्डर’ घेऊन ग्राहकांना घरपोच अंजिरे देण्याची व्यवस्था करतात.रासायनिक 20 टक्के व सेंद्रिय ८० टक्के अशी शेती असल्याने गोड, दर्जेदार ग्राहकांकडून मागणी भरपूर असते. जागेवर प्रतिकिलो 100 रुपये, तर घरपोच 120 रुपये असे त्यांचे दर आहेत.

दुष्काळात जगविली फळबाग

सिंगणापूर भागात अलीकडे पावसाचे प्रमाण कमी झाले आहे. जायकवाडी धरण भरत नाही. अशा परिस्थितीत फळबागापासून उत्पादन घेण्यापेक्षा त्या जीवत ठेवणे अधिक महत्त्वाचे ठरते. अंजिराची झाडे जेव्हा लहान होती तेव्हा पाणी कमी पडले.

एप्रिल व मे महिन्यां मध्ये प्रति टँकर चार हजार रुपये यानुसार आठ टँकर पाणी विकत घेतले.  त्यातून त्यांनी फळबाग जिवंत ठेवली.पाणीटंचाई या वर्षीही आहे. वारंवार टँकर द्वारे पाणी विकत घेण्याची  वेळ येऊ शकते. . त्यावर उपाय म्हणून सिंचन स्रोतांचे बळकटीकरण कारण्यात आले आहे . नवीन विहिरीचे कामही सुरू आहे.

भाजीला बारमाही उत्पादन

गावापासून जवळ परभणी शहरात मार्केट आहे. त्यामुळे खिल्लारे कारले, दोडका, कोथिंबीर, वांगी, टोमॅटो,आदी भाजीपाल्यांची लागवड बारमाही पद्धतीने करतात. त्यातून दररोज ताजे उत्पन्न सुरु राहते.

बैलजोडी व गाय असून त्यांचे शेण  उपलब्ध होते व वेळ प्रसंगीविकत घेण्यात येते.त्यांचा आई दैवशाला यांची शेतीत मोठी मदत अशोक यांना होते. पत्नी विश्रांती यांचीही समर्थ साथ आहे.

फळबागांचे अन्य प्रयोग.. 

खिल्लारे यांनी अन्य फळबागांचेही प्रयोग उत्पन्नस्रोत वाढविण्यासाठी प्रयोग केले आहेत.संत्र्याच्या १८० झाडांची लागवड २०२१ मध्ये एक एकरांत केली आहे.त्यात चंदनाच्या १०० झाडांचे आंतरपीक घेतले आहे. चंदनही १२ वर्षांनी उत्पन्न देण्यास सुरुवात करेल.पण संत्र्याचे उत्पन्न लवकरच सुरू होईल.सफरचंदाच्या हिमाचल प्रदेशातील वाणाच्या १०० झाडांची लागवड सन २०२२ मध्ये केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *