Maharshtra weather: या आठवड्यात पुणे, सांगली, मराठवाड्याचे हवामान कसे असेल?

Maharshtra weather : प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार मराठवाडयात पुढील पाच दिवस हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे. दिनांक 22 व 23 जानेवारी रोजी मराठवाडयाच्या उत्तर भागात सकाळी धुके राहण्याची शक्यता आहे.

मराठवाडयात पुढील चोवीस तासात कमाल तापमानात फारशी तफावत जाणवणार नाही तर दिनांक 22 व 23 जानेवारी रोजी किंचित घट होऊन त्यानंतर वाढ होण्याची शक्यता आहे. पुढील दोन ते तीन दिवसात किमान तापमानात हळूहळू वाढ होऊन त्यानंतर किंचित घट होण्याची शक्यता आहे.

विस्तारीत अंदाजानुसार (ईआरएफएस) मराठवाडयात दिनांक 24 ते 30 जानेवारी 2025 दरम्यान पाऊस सरासरीपेक्षा कमी, कमाल तापमान सरासरीएवढे ते सरासरीपेक्षा कमी व किमान तापमान सरासरीएवढे राहण्याची शक्यता आहे.

सांगली :
प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई यांचेकडून प्राप्त झालेल्या हवामान अंदाजानुसार सांगली जिल्ह्यामध्ये दिनांक २२ ते २६ जानेवारी दरम्यान आकाश मुख्यत: स्वच्छ राहण्याची शक्यता आहे. सांगली जिल्ह्यामध्ये पुढील ५ दिवस कमाल तापमान ३१.० ते ३३.० अंश सेल्सिअस दरम्यान राहण्याची शक्यता आहे.

पुढील ५ दिवसांमध्ये किमान तापमान १९.० ते २२.० अंश सेल्सिअस दरम्यान राहण्याची शक्यता आहे. सकाळची सापेक्ष आद्रता ४६ ते ७२% या दरम्यान तर दुपारची सापेक्ष आद्रता ३५ ते ३८% या दरम्यान राहण्याची शक्यता आहे. वाऱ्याचा वेग ताशी ०४ ते ०७ किमी या दरम्यान राहण्याची शक्यता आहे.

नाशिक :
पुढील पाच दिवसाचा अंदाज लक्ष्यात घेता हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे. आकाश पुढील तीन दिवस अ: ढगाळ राहील तसेच उर्वरित दिवस निरभ्र राहील. तसेच कमाल तापमान २७-३० डिग्री सें. व किमान तापमान १३-१६ डिग्री सें. दरम्यान राहण्याची शक्यता आहे तसेच वा-याचा वेग २-६ कि.मी/तास या दरम्यान राहण्याची शक्यता आहे.

पुणे :
भारतीय हवामान खात्याच्या प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई यांच्या अंदाजानुसार पुणे जिल्हा आणि परिसरात दिनांक २१ ते २५ जानेवारी, २०२५ दरम्यान हवामान कोरडे व अंशतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे.

Leave a Reply