
kanda lagwad: अनेक शेतकऱ्यांचा रांगडा कांदा अजूनही शेतात आहे. सूक्ष्म अन्नद्रव्य मिश्रण ग्रेड-॥ ग्रॅम प्रति लिटर पाणी या प्रमाणात पुनर्लागवडीनंतर ६० आणि ७५ दिवसांनी फवारणी करावी. कांदा पोषणासाठी सूक्ष्म अन्नद्रव्यांची फवारणी फायदेशीर राहते.
फुलकिडे (थ्रीप्स) आणि करपा रोगाच्या नियंत्रणाकरिता, कार्बोसल्फान (२५ ईसी) २ मिली अधिक ट्रायसायक्लॅझोल (७५ डब्ल्यूपी) १ ग्रॅम प्रति लिटर पाणी प्रमाणे फवारणी करावी.
इरिओफाईड माइट्सचा प्रादुर्भाव आढळल्यास, गंधक (८० डब्ल्यूडीजी) २ ग्रॅम किंवा डायकोफॉल (१८.५ ईसी) २ मिली प्रति लिटर पाणी प्रमाणे फवारणी करावी.
बुरशीनाशक किंवा कीटकनाशक यांच्या फवारण्या कांदा काढणीच्या २० दिवसांपूर्वी बंद कराव्यात.
डेंगळे आलेले कांदे दिसल्यास त्वरित काढून टाकावे. पिकाला जमिनीचा मगदूर, तापमान व पिकाची गरज पाहून ८ ते १२ दिवसांच्या अंतराने पाणी द्यावे.