Number plate : शेतकरी आणि वाहनचालकांसाठी महत्त्वाची बातमी! HSRP नंबर प्लेटसाठी मुदतवाढ..

राज्यातील शेतकरी आणि वाहनचालकांसाठी महत्त्वाची घोषणा करण्यात आली आहे. महाराष्ट्र शासनाने १ एप्रिल २०१९ पूर्वी नोंदणी झालेल्या वाहनांसाठी उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक पाटी (HSRP) बसविणे बंधनकारक केले आहे. याआधी या क्रमांक पाट्या बसविण्यासाठी ३१ मार्च २०२५ ही अंतिम मुदत होती. मात्र, अपेक्षेपेक्षा कमी प्रतिसाद मिळाल्याने आता वाहनमालकांना ३० जून २०२५ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

सुरक्षेसाठी महत्त्वाचा निर्णय
उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक पाटी बसविण्याचा निर्णय हा मुख्यतः वाहनचोरी रोखणे, बोगस नंबर प्लेट्स टाळणे आणि वाहतूक व्यवस्थापन अधिक प्रभावी करण्याच्या उद्देशाने घेण्यात आला आहे. शेतकरी आणि सर्वसामान्य वाहनचालकांनी या निर्णयाची नोंद घेऊन आपली वाहने वेळेत अधिकृत HSRP क्रमांक पाटीने सुसज्ज करावीत.

अधिकृत उत्पादकांची निवड
परिवहन विभागाने या क्रमांक पाट्या बसविण्यासाठी तीन अधिकृत उत्पादकांची निवड केली आहे. त्यामुळे वाहनमालकांना अधिकृत आणि दर्जेदार क्रमांक पाट्या बसविता येतील.

वाहनचालकांनी काय करावे?
– १ एप्रिल २०१९ पूर्वी नोंदणी झालेल्या वाहनांना अनिवार्यपणे HSRP नंबर प्लेट बसवावी
– अधिकृत उत्पादकांकडूनच या क्रमांक पाट्या बसवून घ्याव्यात
– ३० जून २०२५ पूर्वी ही प्रक्रिया पूर्ण करावी, अन्यथा दंडात्मक कारवाई होऊ शकते

वाहनचालक आणि शेतकऱ्यांनी वेळेत ही प्रक्रिया पूर्ण करून वाहतूक नियमांचे पालन करावे आणि आपल्या वाहनांची सुरक्षा अधिक बळकट करावी, असे आवाहन राज्य सरकारने केले आहे.

Leave a Reply