Soybean Bajarbhav: हमीभाव केंद्रांची खरेदी संथ गतीने, सोयाबीन वधारणार, पण कधी?

सोयाबीनचे बाजारभाव (Soybean Bajarbhav) कमी असल्याने ऐन निवडणुकीच्या तोंडावर केंद्र सरकारने नाफेडच्या माध्यमातून हमीभाव केंद्र (Nafed soybean msp centers) सुरू केले. त्यानंतर स्थानिक बाजारात सोयाबीनच्या बाजारभावांवर किरकोळीने वाढ होऊन शनिवार आणि रविवारी (२४ नोव्हे.) सोयाबीनचे सरासरी दर पुन्हा ४ हजार ते ४२०० रुपये आले.

शुक्रवार दिनांक २२ नोव्हेंबर रोजी सांगली, वाशिम अशा काही बाजारात सोयाबीनचे बाजारभाव हमीभावापर्यंत पोहोचले होते. मात्र या ठिकाणी सोयाबीनची आवक अवघी ६५ ते १०० क्विंटल इतकीच झाल्याने भाव वधारल्याचे समजते. कृषी २४ ने काही एफपीओंच्या प्रतिनिधींशी चर्चा केल्यावर समजले की नाशिक, नगरसह राज्यातील अनेक भागात अजूनही सोयाबीन हमीभाव केंद्र सक्रीय झालेले नाहीत. त्यामुळे सोयाबीनची हमी भाव खरेदी पाहिजे तशा मोठ्या प्रमाणात झालेली नसल्याने भाव अजूनही हमी भावापेक्षा कमीच आहेत.

मात्र लवकरच ही सरकारी हमीभाव खरेदी केंद्र सुरू होतील आणि त्यामुळे स्थानिक बाजारातही सोयाबीन पाच हजारापर्यंत पोहोचेल अशी शेतकऱ्यांना अपेक्षा आहे. तर बाजारातील व्यापारी अजून वेट अँड वॉचच्या स्थितीत असून मागणी-पुरवठ्याच्या गणितानुसारच बाजारभाव वधारण्याची शक्यता आहे. असे असले तरी या आठवड्यात स्थानिक बाजारातील भाव वधारू शकतात असा काही तज्ज्ञांचा अंदाज आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *