सातबारा उताऱ्यावर आईचे नाव लावणे या तारखेपासून बंधनकारक, सरकारचा मोठा निर्णय!

आता आईचे नाव सातबारा उताऱ्यावर देखील लावण्यात येणार आहे, महाराष्ट्र सरकारने हा महत्वाचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाची अंमलबजावणी 1 नोव्हेंबरपासून करण्यात येणार आहे.

भूमी अभिलेख विभागाने दिलेल्या माहितीनुसार 1 मे 2024 नंतर जन्मलेल्यांना जमीन खरेदी करताना सातबारा उताऱ्यावर आईचे नाव लावणे बंधनकारक असणार आहे. आईचे नाव सरकारी कागदपत्रांवर लिहिणे बंधनकारक केले त्यानंतर आता राज्य सरकारने सातबाऱ्यावर आईचे नाव लिहणे हा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.

१ मे २०२४ नंतर जन्मलेल्या व्यक्तीसाठी

भूमी अभिलेख विभागाच्या प्रस्तावानुसार जर १ मे २०२४ जन्म झाल्याच्या नावावर जमीन खरेदी करायची असेल तर संबंधितांच्या आईचे नाव लावणे बंधनकारक केले आहे . परंतु , वडिलांचे नाव बंधनकारक नसेल.विवाहितांना पतीचे किंवा वडिलांचे नाव लावण्याची मुभा देण्यात येणार आहे. सरकारकडे हा प्रस्ताव भूमी अभिलेख विभागाने  पाठवला आहे. तसेच पुढील काळात जमीन व्यवहारामध्ये फेरफार करण्यात आल्यास त्यावरदेखील आईचे नाव लावण्यात येणार आहे.

राज्य सरकारने भूमी अभिलेख विभागाकडे या निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठीचा प्रस्ताव पाठविला होता.यातील त्रुटींचा अभ्यास करून त्यावर उपाययोजना करण्यात आल्या असून आता या निर्णयाची अंमलबजावणी एक नोव्हेंबरपासून करण्यासाठीचा प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठविण्यात आला आहे  – सरिता नरके, राज्य समन्वयक ई फेरफार प्रकल्प, भूमी अभिलेख

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *