Kanda Bajarbhav : आज लासलगाव बाजारात लाल कांद्याला काय बाजारभाव मिळाले?

Kanda Bajarbhav :  आज दिनांक २ डिसेंबर २४ रोजी कांद्यासाठी प्रसिद्ध असलेल्या लासलगाव बाजारसमितीत सकाळच्या सत्रात लाल कांद्याची ८०० नग म्हणजेच सुमारे साडेसात हजार क्विंटल आवक झाली. या ठिकाणी कमीत कमी १५०० रुपये, जास्तीत जास्त ४५०० रुपये तर सरासरी ३७०० रुपये प्रति क्विंटल असा बाजारभाव मिळाला.

दरम्यान आज अकलुज बाजारसमितीत सकाळच्या सुमारास लाल कांद्याची २१० क्विंटल आवक होऊन किमान १५००, जास्तीत जास्त ६५०० रु. तर सरासरी ४५०० रुपये बाजारभाव मिळाला.

काल रविवार दिनांक १ डिसेंबर रोजी नाशिकच्या लासलगाव व पिंपळगाव बाजारासमितीत कांद्याच्या लिलावांना सुटी होती. मात्र राज्यात पुण्यासह इतर बाजारसमित्या सुरू होत्या. त्यानुसार काल पुणे बाजारसमितीत सकाळी झालेल्या कांदा व्यवहारात लोकल कांद्याला किमान २ हजार रुपये आणि सरासरी ४२५० रुपये बाजारभाव मिळाला, तर जास्तीत जास्त ६५०० रुपये बाजारभाव मिळाला.

काल १ डिसेंबर रोजी पुणे बाजारसमितीत लोकल कांद्याची सुमारे १९ हजार क्विंटल आवक झाली. दुसरीकडे आज सातारा बाजारात कांद्याची २४८ क्विंटल आवक झाली. या ठिकाणी लोकल वाणाला किमान २ हजार रुपये, जास्तीत जास्त ५ हजार रुपये आणि सरासरी ४ हजार रुपयांचा बाजारभाव मिळाला.

 
 
 
 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *