दोन एकर खरबुज शेतीतुन आठ लाखाची लाॅटरी,वाचा सविस्तर ..

युवक चेतन संतोष नागवडे हे वांगदरी येथील पदवीधर आहेत. त्यांनी शिक्षक होण्याचा नाद सोडून दिला आणि शेतीमध्ये करिअर करण्याचा निर्णय घेतला त्यांनी उन्हाळ्यात खरबुज कलिंगड या झटपट येणाऱ्या पिकांकडे फोकस केला . या वर्षी खरबुज फळांना चांगला भाव मिळाला अवघ्या ७० दिवसात दोन एकरात ७ लाख ७० हजाराची लाॅटरी खरबुज पिकातून त्यांना लागली आहे.

श्रीगोंदा येथील श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालयातून चेतन नागवडे यांनी एम ए केले आणि घारगाव येथील साईकृपा महाविद्यालयात बी एड साठी प्रवेश घेतला. शिक्षक होऊन दर महिन्याला ठराविक पगार घेण्यापेक्षा वडिलोपार्जित सात एकर शेतीमध्ये पिक पॅटर्न बदल करण्याचा निर्णय घेतला आणि त्यादृष्टीने नियोजन केले.

चेतन संतोष नागवडे यांनी काष्टी येथील कृषी तज्ञ भाऊ शेलार व शहाजी फराटे यांना गुरु मानले आणि उन्हाळा कलिंगड खरबुज ही पिक घेण्यावर भर दिला कोरोना कालावधी पासून दरवर्षी सात एकर पैकी ५० टक्के क्षेत्रावर कलिंगड खरबूज पिक घेण्याचा मास्टर प्लॅन तयार केला या शेतीने चेतन नागवडे यांना आर्थिक पाठबळ दिले.

या वर्षी त्यांनी कांदा पिक घेतले कांदा काढुन त्या शेतात खरबुजाची दोन एकर क्षेत्रामध्ये ७० दिवसामध्ये ३८ मे टन उत्पादन काढले आणि खरबुजाला २२ ते २६ रू किलो प्रमाणे भाव मिळाला दोन एकरात ७ लाख ७० हजार एवढे उत्पन्न मिळवले यातून चेतन नागवडे यांच्या नियोजन व कष्टाचे चिज झाले.

नोकरी लागली तर काही वर्षे कमी पगारावरती काम करावे लागते शेतीत चांगले कष्ट योग्य नियोजन केले तर निश्चितच आर्थिक फायदा मिळतो .याचा अनुभव त्यांनी मित्राकडून घेतला. आणि पदवीधर असुन देखील शेतीत करिअर करण्याचा निर्णय घेतला आणि त्यांना यश आले. ही समाधानाची बाब आहे. – चेतन नागवडे, शेतकरी वांगदरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *