राज्यातील प्रत्येक कुटुंबाला पाच लाखांचं आरोग्य कवच,

राज्यातील प्रत्येक कुटुंबाला पाच लाखांचं आरोग्य कवच,

राज्य शासन महाराष्ट्र राज्यातील प्रत्येक कुटुंब आणि प्रत्येक व्यक्तीच्या हिताचा विचार करत काही योजनेची अंमलबजावणी करत असतात .या योजनेदवारे अनेकांना मोठ्या मदतीचा हात देतात. त्यात आता आणखीन एक महत्त्वाची गोष्ट जोडली जाणार आहे. ती म्हणजे आरोग्याबाबतच्या नियोजनाची  .

महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेसाठी अधिवास प्रमाणपत्र आणि शिधापत्रिका असणाऱ्यांना आरोग्य सुविधांचा लाभ घेता येणार आहे.थोडक्यात म्हणजे केशरी आणि  अंत्योदय शिधापत्रिका सिमित असणारी ही योजना आता मात्र सरसकट नागरिकांना लागू होणार आहे.

राज्य शासनाने बुधवारी अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेत या योजनेचा केंद्र शासनाच्या आयुष्मान भारत योजनेची एकत्रीकरण करत आरोग्य कवच दीड लाखावरून थेट आता पाच लाख पर्यंत केले आहेत .या योजनेचा राज्यातील सर्व कुटुंबाला लाभ घेता येणार आहे. महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना अंतर्गत एकूण 996 आणि प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेमध्ये 1209 इतक्या उपचारांचा समावेश आहे. या दोन्ही योजनेचे एकत्र येण्यानं दोन्ही योजनांमध्ये असणाऱ्या सुविधांचा लाभ नागरिकांना येता येणार आहे.

योजना कसं काम करणार

नागरिकांनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी शहरातील जवळच्या शासकीय रुग्णालयात तपासणी करून घ्यावी.

‘शासकीय आरोग्य शिबिरामध्ये’ ग्रामीण भागातील नागरिकांनी जाऊन आजाराची तपासणी करून घ्यावी.

आजाराची खात्री झाल्यानंतर रुग्णाच्या रोगाची आणि खर्चाची माहिती आरोग्य मित्रांना दिली जाईल.

24 तासाच्या आत ही प्रक्रिया पूर्ण होऊन उपचार सुरू होतात.

महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेचा लाभ घेण्यासाठी कशी कराल नोंदणी आणि काय आहेत पात्रता

या योजनेचा लाभ घेण्यासाठी ती व्यक्ती महाराष्ट्रातील हवी आहे.

योजनेचा लाभ घेण्यासाठी त्या नागरिकाकडे अधिवास प्रमाणपत्र किंवा शिधापत्रिका असावी.

शिधापत्रिका ही कोणत्याही रंगाची असली तरीही या योजनेचा लाभ घेता येणार आहे.

या योजनेसंदर्भात माहितीसाठी याhttps://www.jeevandayee.gov.in/ वेबसाईटवर भेट द्या.

या वेबसाईटवर लॉगिन पर्याय निवडा त्यानंतर एक नवीन फार्म तुमच्यासमोर येईल.

त्या फार्मवर आवश्यक माहिती आणि स्कॅन करत कागदपत्रांची पूर्तता करावी लागेल.

पुढे सबमिट या बटनावर क्लिक करावे अशा रीतीने तुम्ही या योजनेसाठी नोंदणी करण्याचा टप्पा पार करत योजनेचा लाभ मिळू शकता.

या योजनेसाठी काही प्राथमिक कागदपत्रांची पूर्तता करणे गरजेचे आहे. त्यामध्ये आधार कार्ड, सरकारी डॉक्टरांकडून मिळालेल्या आजाराची प्रमाणपत्र, रेशन कार्ड, वयाचे प्रमाणपत्र, अर्जदाराचे पासपोर्ट साईज तीन फोटो, उत्पन्नाचा दाखला, याचा समावेश आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *