ऊस उत्पादकांसाठी आनंदाची बातमी आहे . कमिशन फॉर अॅग्रिकल्चर कास्ट्स अँड प्राइजच्या शिफारशीनुसार उसाचा एफआरपी वाढवण्याच्या निर्णयावर हिरवा कंदील देण्यात आला आहे.
त्यामुळे ऊस उत्पादकांना दिलासा मिळालेला आहे .केंद्र सरकारच्या या निर्णयाचा लाखो उत्पदकांना फायदा होणार आहे .विशेष करून उत्तर प्रदेश व महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना याचा फायदा होणार आहे .केंद्राच्या कॅबिनेट बैठकीत उसाचा एफ आर पी वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे .ऊसाच्या एफ आर पी मध्ये दहा रुपयांनी वाढ करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतलेला आहे.
केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे ऊसाच्या एफआरपीमध्ये 305 वरून वाढ होऊन 315 रुपये प्रतिक्विंटल मागे वाढ होणार आहे. हा निर्णय ऑक्टोंबर पासून सुरू होणाऱ्या गळीत हंगामापासून लागू होणार आहे.
एफआरपी वाढवण्याचा निर्णय
सरकारने घेतलेला हा निर्णय अनेक उत्पादकांसाठी फायदेशीर होणार आहे .एफ आर पी वाढवण्याच्या निर्णयामुळे उत्तर प्रदेश राज्यातील शेतकऱ्यांनाही त्याचं फायदा मिळणार असल्याचे सांगण्यात आले.
साखरेचे उत्पादन वाढले
उत्तर प्रदेशात साखर कारखान्याची संख्या 119 पेक्षा जास्त असून पन्नास लाखापेक्षा जास्त ऊस उत्पादक शेतकरी आहेत. तरी यावर्षी उत्तर प्रदेशांमध्ये ११०२.४९ लाख टन उसाचे उत्पादन झाले आहे .तर साखर कारखान्यांनी 1 हजार 99.49 लाख टन उसाचे गाळप करण्यात आले आहे. त्यामधून कारखान्यांनी 105 लाख टन साखरेचे उत्पादन केले आहे.
उत्तर प्रदेश अव्वल
उत्तर प्रदेशमधील शामली या जिल्ह्यात सर्वाधिक उसाचे उत्पादन होते. या जिल्ह्यांमध्ये उसाचे सरासरी उत्पादन हे हेक्टरी 962 12 क्विंटन एवढे होते .यावर्षी संपूर्ण देशात साखरेचे उत्पादन 35.76 दश लक्ष टनांवर 32.8 दशलक्ष टनांवर आले असल्याचे सांगण्यात आले आहे.