मान्सूनचा वेग वाढला ! आता राज्यात कोणकोणत्या भागात अतिवृष्टीचा इशारा…

मान्सूनचा वेग वाढला ! आता राज्यात कोणकोणत्या भागात अतिवृष्टीचा इशारा...

यंदा मान्सून उशिरा दाखल झाल्यामुळे अनेकांची चिंता वाढली होती .परंतु आता मान्सूनचे आगमन झालेले आहे. तसेच मान्सूनचा वेग देखील वाढला आहे. त्यामुळे कोकणला दोन जुलै पर्यंत अतिवृष्टीचा इशारा देण्यात आलेला आहे. तसेच पुणे, सातारा, नाशिक येथे तीन दिवस सावधानतेचा इशारा देण्यात आलेला आहे.

अरबी समुद्र पासून गुजरात पर्यंत कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे, महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढत आहे .अरबी समुद्रातून गुजरात किनारपट्टी व केरळ पर्यंत कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे ,कोकणला दोन जुलै पर्यंत अतिवृष्टीचा इशारा देण्यात आलेला आहे. तसेच ठाणे, नाशिक, सातारा, पुणे ,या भागात तीन दिवस अतिवृष्टीचा इशारा देण्यात आलेला आहे.

मध्य महाराष्ट्र मराठवाडा 30 जुलैपर्यंत सतत धार पाऊस होईल 98% मान्सूनने आत्तापर्यंत देश व्यापला आहे. मंगळवारी मान्सून ने गुजरात राज्य पार करीत राजस्थानसह पंजाब आणि हरियाणा चा काही भाग व्यापला आहे .आता फक्त दोनच टक्के देश बाकी असून राजस्थान सह हरियाणाचा काही भाग बाकी आहे .तो देखील येत्या 48 तासांमध्ये शंभर टक्के व्यापला जाणार आहे.

पूर्व विदर्भातील भंडारा, नागपूर, गडचिरोली, गोंदिया, या जिल्ह्यातही पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे. तसेच नाशिक, नंदुरबार, परभणी ,जालना, नांदेड ,हिंगोली, आणि विदर्भातील इतर जिल्ह्यांमध्ये ठिकठिकाणी जोरदार पावसाचा येलो अलर्ट देण्यात आलेला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *