इथेनॉल निर्मिती प्रकल्पांबरोबरच आता पोल्ट्री उद्योगातूनही मक्याची मागणी वाढत आहे. त्यामुळे मका उत्पादकाला दरही चांगले मिळत आहे. सकारात्मक परिणाम याचा मक्याच्या लागवडीवर दिसून आला आहे. या वर्षी मागील वर्षीच्या तुलनेत मक्याची लागवड तब्बल १० लाख हेक्टरने वाढली आहे.
जुलैच्या पहिल्या आठवड्यामध्ये चाळीस लाख हेक्टर क्षेत्रावर मक्याची लागवड झाली आहे. मागील वर्षी याच कालावधीमध्ये ही लागवड ३० लाख हेक्टरपर्यंत होती. गेल्या वर्षी मक्याचे भाव सतत वाढलेले राहिले. यामुळे निर्यात तही कमी झाली. विशेष म्हणजे देशांतर्गत बाजारातमध्येच जादा दर मिळाल्याने सर्वाधिक मका स्थानिक बाजारामध्ये विकला गेला. मका उत्पादनाला उसाचे इथेनॉल निर्मितीवरील अवलंबित्व कमी करण्यासाठी केंद्रानेही चालना दिली आहे. त्यामुळे मक्याची लागवड वाढण्यावर याचा परिणाम झाला आहे.
देशामध्ये रब्बी आणि खरीप या दोन्ही हंगामामध्ये मक्याचे पीक घेतले जाते. खरीप हंगामामध्ये तब्बल ८३ टक्के मका घेतला जातो. तर रब्बी हंगामामध्ये तेरा टक्के मक्याचे उत्पादन घेतले जाते . देशामध्ये मक्याचे सर्वात जास्त उत्पादन मध्यप्रदेश ,कर्नाटक, आणि केरळ या राज्यामध्ये घेण्यात येते . या तिन्ही राज्यामध्ये एकूण मका उत्पादनापैकी ४० टक्क्यांहून अधिक मका हा घेण्यात येतो . मका उत्पादन घेणाऱ्या पहिल्या दहा राज्यामध्ये ९ वा नंबर महाराष्ट्राचा येतो .
केंद्राने मागील वर्षी इथेनॉल निर्मितीचा जादा भार असणाऱ्या साखर उद्योगावर बंधने घातली . त्यामुळे साखर उद्योगातून अपेक्षित इथेनॉल निर्मिती झाली नाही. त्यामुळे मक्या सारख्या धान्यापासून तयार होणाऱ्या इथेनॉलसाठी मागणी वाढली .मागील वर्षी दुष्काळी परिस्थिती असल्यामुळे मक्याची पेरणी मध्ये घट झाली होती. यामुळे उत्पादनही कमी झाले होते . याचाच परिमाण मक्याच्या दरावरती झाला . मका चांगला दर मिळत असल्यामुळे यंदा राज्यांमध्ये मक्याला प्राधान्य देण्यात येत असल्याचे केंद्रीय कृषी विभागाच्या सूत्रांनी सांगितले. पंजाबसारख्या राज्यामध्ये मका बियाण्यासाठी किलोला शंभर रुपयापर्यंतचे अनुदान दिले आहे व शेतकऱ्याला मका लागवडीला प्रोत्साहित करण्यात आले आहे.
मका लागवडीसाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहन
केंद्राने मका संशोधन प्रकल्पांना मक्याच्या संशोधनावर गंभीरपणे काम करण्याच्या सूचना दिल्या आहेत. केंद्राने मका संशोधन प्रकल्पांना मक्याच्या संशोधनावर अधिक लक्षपूर्वक काम करण्याचे निदेश दिले आहेत . मका लागवडीसाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहित करा ,अश्या सूचना केंद्रीय पातळीवरून सांगण्यात आल्या आहेत .त्यामुळे मका लागवडीसाठी शेतकऱ्यांना विविध योजनांचा लाभ दिला आहे . आता केंद्राकडून जास्त उत्पादन देणाऱ्या मका वाणांवर काम करण्यासाठी अधिक प्रयत्न करण्यात येत आहे. यंदा सुमारे १०० हेक्टर क्षेत्रावर मक्याची प्रात्यक्षिके कोल्हापूर,सातारा, सोलापूर ,सांगली, आदी जिल्ह्यांत घेण्यात आली .
मक्याचे बियाणे शेतकऱ्यांना पुरवणे, त्यांना वेळोवेळी मार्गदर्शन केले जावे त्यामुळे मक्याचे उत्पादन वाढून मक्यातून चांगला नफा मिळू शकतो हे शेतकऱ्यांना पटवून देण्यासाठी शेतकरी मेळाव्यासह वैयक्तिक संपर्कातूनही प्रयत्न केले जावे .
– डॉ. सुहास भिंगारदिवे, सहाय्यक मका कृषी विद्यावेत्ता,मका संशोधन केंद्र, कसबा बावडा, कोल्हापूर












