जळगावच्या शेतकरी पुत्राची कमाल, पेरणी केल्यावर शेतीला दोन महिने पाण्याची गरज भासणार नाही ?

जळगाव जिल्ह्यामधील सुनील पवार हे शेतकरी पुत्र व मेकॅनिकल इंजिनिअर असून त्यांनी शेती क्षेत्रामध्ये अत्यंत प्रभावी असे संशोधन केले आहे . एक विशिष्ट जैविक पावडर उत्पादित केली असून ही जैविक पावडर पेरणीच्या बियाणांसोबत मिश्रण केल्यानंतर संबंधित पिकाला दीड ते दोन महिने पाण्याची गरज लागत नाही . सुनील पवार यांनी दावा केला आहे.  की या पावडरचे पेटंट देखील सुनील पवार यांनी नोंद केली आहे.

विशेष म्हणजे सुनील पवार यांच्या या संशोधनाची कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी देखील दखल घेतली आहे.  मुंडे यांनी सुनील पवार यांच्याशी दूरध्वनी वरून संपर्क साधून चर्चा केली आहे.  कृषी विद्यापीठातील तज्ज्ञांची एक टीम पुढील आठवड्यात सुनील पवार यांनी संशोधन केलेल्या या पावडरचा व त्यांनी वापर केलेल्या शेतीचा अभ्यास करण्यासाठी जळगाव जिल्ह्यात जाणार आहे.  या टीमचा अहवाल आल्यानंतर पुढील निर्णय घेण्यात येईल.  असे मुंडे यांच्याकडून सांगण्यात आले आहे.

मका आणि अनेक दिवस पाणी आपल्या साठवून ठेवण्याची क्षमता असलेल्या अन्य काही जैविक घटकांना एकत्र करून ही जैविक पावडर तयार करण्यात आली आहे. त्यामुळे दीड ते दोन महिने पाणी साठवून ठेवण्याची क्षमता या जैविक पावडर मध्ये असून कमी पाण्याच्या किंवा दुष्काळी भागात ही पावडर शेतीला वरदान ठरणार आहे.  असा दावा सुनील पवार यांनी केला आहे.

तर शेती क्षेत्रात क्रांती घडवणारा हा निर्णय ठरेल.

पेरणी पासून ते पिकांना पाणी देण्याच्या काळात सुनील पवार यांनी संशोधन केलेली जैविक पावडर  दीड ते दोन महिने पाणी नसले तरी पिकांना जगवु शकते. आपण पिकांना जगू शकतो . हा प्रयोग पूर्णपणे जर यशस्वी झाला तर शेती क्षेत्रात क्रांती घडवणारा हा निर्णय ठरेल तसेच दुष्काळी व अवर्षणग्रस्त भागात देखील ही पावडर एक प्रकारचे वरदान म्हणून ठरणार आहे . म्हणूनच चाळीसगाव येथे आम्ही लवकरच कृषी विद्यापीठाच्या तज्ञांची एक टीम सुनील पवार यांच्या भेटीला पाठवत आहोत.  या टीमचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर पुढील निर्णय घेऊ असे मत धनंजय मुंडे यांनी व्यक्त केले आहे.

मराठवाड्यासाठी वरदान ठरेल !

नेहमी दुष्काळाचा सामना करणाऱ्या मराठवाड्यात सतत पाणी प्रश्न निर्माण होतो . त्यामुळे अनेकदा पावसाचा खंड पडल्यास दुबार पेरणीचे संकट निर्माण होतात.  बरेचदा दुबार पेरणी करूनही पावसाअभावी पीक करपून जातात.  त्यामुळे सुनील पवार यांनी दावा केलेला प्रयोग यशस्वी ठरल्यास हे मराठवाड्यासाठी वरदान ठरू शकते. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *