केंद्र सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी अनेक योजना राबवल्या जातात. यापैकीच एक असणारी पीएम किसान योजना होय. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना वर्षाला सहा हजार रुपये दिले जातात. हे तर तुम्हाला माहितीच आहे. शेतकरी आता चौदाव्या हप्त्याच्या प्रतीक्षेत आहेत . आता या शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. ती म्हणजे 14 वा हप्त्याची तारीख निश्चित करण्यात आलेली आहे . तसेच राज्यातील किती शेतकरी पात्र झाले आहेत. याबाबतची माहिती देखील देण्यात आलेली आहे.
कधी येणार पी एम किसान 14 वा हप्ता
पीएम किसान 14 वा हप्त्याचे पैसे 28 जुलै रोजी शेतकऱ्यांच्या खात्यात वितरित केले जातील . तर या दिवशी सुमारे 9 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यावर दोन हजार रुपयांचा हप्ता पोहोचले. या योजनेचा मागील हप्ता 27 फेब्रुवारी रोजी कर्नाटकातून जारी करण्यात आला होता. शेतकऱ्यांच्या आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी सरकारने ही योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत सरकार प्रत्येकी दोन हजार रुपयांच्या तीन हप्ते मध्ये वार्षिक सहा हजार रुपये वितरित करतात . दर चार महिन्यांनी हप्त्याचे पैसे खात्यात जमा केले जातात
या शेतकऱ्यांना पैसे मिळणार नाहीत.
पीएम किसान सन्मान निधी मध्ये सुमारे 9 कोटी लोकांना पैसे वितरित केले जाणार आहे . अठरा हजार कोटी रुपयांचे बजेट सरकारने केले आहे. ज्या शेतकऱ्यांनी ई केवायसी चे काम पूर्ण केले आहे. त्यांनाच या हप्त्याची रक्कम दिली जाईल.
अशाप्रकारे करा एक केवायसी
सर्वप्रथम पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या अधिकृत पोर्टलवरpmkisan.gov.in
वेबसाइट गेल्यानंतर तुम्हाला स्क्रीन मधील शेतकऱ्याच्या कोपऱ्यात ई-केवायसीचा पर्याय निवडावा लागेल.
या पर्यायावर क्लिक केल्यानंतर ए. तुमच्या स्क्रीनवर नवीन पेज उघडेल.
आता शोध या बटनावर क्लिक करा.
यानंतर तुमच्या आधार कार्ड वरून नोंदणीकृत मोबाईल नंबर टाका व त्यावर ओटीपी येईल.
आता ओटीपी टाकल्यानंतर सबमिट या बटनावर क्लिक करा.
तुमची एक केवायसी पूर्ण होईल.
पीकविम्यात गतवर्षीपेक्षा अधिक सहभाग
खरिपासाठी पंतप्रधान पिक विमा योजना राबवली जात आहे. नगर जिल्ह्यामध्ये यंदा गेल्यावर्षीपेक्षा जास्त शेतकऱ्यांनी सहभाग घेतला आहे. अजूनही आठ दिवस राहिलेले असून जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी यामध्ये सहभागी व्हावे ,असे आव्हान सुधाकर बोराळे यांनी पत्रकार परिषदेमध्ये केले आहे.
यंदा खरिपासाठी बाजरी, भुईमूग ,भात, सोयाबीन, मूग,तुर कापूस, मका ,उडीद, कांदा ,या पिकांसाठी पंतप्रधान पिक विमा योजना राबवली जात आहे .
31 जुलै पर्यंत पिक विमा भरण्याची तारीख आहे . 21 जुलै पर्यंत जिल्ह्यातील चार लाख एक हजार 124 शेतकऱ्यांनी पिक विमा भरला आहे. गेल्यावर्षी किंवा दोन लाख 23 हजार 224 शेतकरी सहभागी झाले होते. यंदा अजून विमा भरण्यासाठी आठ दिवसाचा अवधी आहे. त्यामुळे पाच लाखापेक्षा अधिक शेतकरी यामध्ये सहभागी होतील.