देशातील काही भागात मान्सून सक्रिय झाल्याचे दिसत आहे. अनेक भागांमध्ये जोरदार सरी पडत आहेत. बहुतांश ठिकाणी जोरदार पावसाची प्रतीक्षा कायम आहे. तर आज राज्यात पाच जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाचा येलो अलर्ट देण्यात आलेला आहे.
सर्वसाधारण स्थिती पेक्षा मान्सूनचा कमी दाबाचा पट्टा दक्षिणेकडे सरकला आहे. कमी दाबाचा पट्टा बिकानेर, राईसेन, मांडला, अंबिका नगर, बालासोर, ते बंगालच्या उपसागराच्या मध्यापर्यंत आहे.
दक्षिण गुजरात पासून उत्तर केरळ पर्यंत किनारपट्टीला समांतर कमी दाबाचा पट्टा विस्तारलेला आहे.. पश्चिम बंगाल आणि उत्तर उडीसाच्या किनारपट्टी लगत निर्माण झालेली चक्रार वाऱ्याची स्थिती झारखंड आणि शेजारच्या भागाकडे सरकली आहे . ही चक्राकार स्थिती समुद्रसपाटी पासून 5.8 किलोमीटर उंचीवर आहे .दक्षिणेकडे ही चक्राकार वाऱ्याची स्थिती झुकलेली आहे.
आज राज्याच्या काही भागात पाऊस झाला असून, दुपारपर्यंत अनेक ठिकाणी पावसाची उघडीप होती. आज नागपूर,, गडचिरोली, भंडारा, आणि गोंदिया जिल्ह्यात काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी पडल्या अमरावती आणि अकोला जिल्ह्यात काही ठिकाणी पावसाचा शिडकाव झाला असून, बुलढाणा वाशिम जिल्ह्यात पावसाची विश्रांती होती .मराठवाड्यातील नांदेड, लातूर, बीड व धाराशिव जिल्ह्यात काही ठिकाणी पावसाची भुरभुर सुरू होती .खानदेशात बहुतांशी ठिकाणी आज पाऊस नव्हता. कोकण आणि मध्य महाराष्ट्रात ठीक ठिकाणी पावसाने हजेरी लावली.
आज राज्याच्या काही भागांमध्ये जोरदार पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला होता . आज कोकणातील रत्नागिरी, रायगड पालघर व मध्य महाराष्ट्रातील सातारा, पुणे जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी जोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला . तर कोकणातील सिंधुदुर्ग व ठाणे तसेच मध्य महाराष्ट्रातील कोकण, नाशिक तर संपूर्ण विदर्भात ठिकठिकाणी जोरदार पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे, तर मराठवाड्यात काही ठिकाणी हलक्या सरी पडू शकतात.