
पपई बाजारात वर्षभर मिळते .पपई 40 ते 50 रुपये किलो विकली जाते. उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल, तमिळनाडू हरियाणा तसेच पंजाब इतर राज्यात देखील पपईची लागवड केली जाते. कित्येक राज्यात पपई लागवडीवर अनुदान देखील दिले जात असते.
बिहारचे शेतकरी पपई लागवड मोठ्या प्रमाणावर करतात, बिहारमध्ये दरभंगा हाजीपुर ,मधुबनी, अशा अनेक जिल्ह्यात पपईची शेती केली जाते.बेगूसराय जिल्ह्यामधील एका शेतकऱ्याने पपईची लागवडीतून चांगले उत्पन्न मिळवले आहे. चेरीया, बरियारपूर भागातील नीरज सिंह हे पपईच्या शेतीतून तब्बल दहा लाख रुपयांची कमाई करत आहे.
अशी मिळाली प्रेरणा
नीरज सिंग यांना एका टीव्ही शोमधून पपई पिकवण्याविषयी माहिती मिळाली आणि त्यांना स्वतःची पपई शेती सुरू करण्यासाठी सरकारकडून खूप पाठिंबा मिळाला. कृषी विभागाकडून त्यांना रोप दिले गेले .एका पपईच्या झाडापासून सर्व साधारणपणे 25 किलो पपईचे उत्पादन त्यांना मिळते.
दहा लाख रुपये नफा
नीरज सिंग यांनी आपल्या बागेत रेड लेडी जातीची पपई लागवड केली. काही झाडांपासून शंभर किलोपर्यंत उत्पादन ते घेतात .त्यांच्या बागेत दहा महिला रोज काम करत असतात. अशा प्रकारे त्यांनी दहा लोकांना रोजगार दिला आहे.
रेड लेडी जातीची पपई लागवड दोन एकर जागेत त्यांनी केली आहे .दरवर्षी ते दहा लाख रुपयांची पपई विक्री करतात. यासाठी सुमारे चार लाख रुपये खर्च येतो. व त्यांना शुद्ध नफा हा सहा लाख रुपये मिळतो. नीरज सिंग यांनी परंपरागत शेती करण्यापेक्षा फळबागेकडे ते वळणे त्यांनी सरकारकडून एकरी 45 हजार रुपयांचे अनुदान घेतले.