‘‘महिलांवर अत्याचार करणे हा गुन्हा आहे. त्याला माफी देणार नाही. सरकारे येणार आहेत जाणार आहेत . सर्वोच्च प्राधान्य महिला सुरक्षेस द्यावे, महिलांच्या सुरक्षेबाबत कुणालाही पाठीशी घालू नका, अशा सूचना सर्व राज्य सरकारांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्यात. जळगावामध्ये रविवारी झालेल्या लखपती दीदी संमेलनात लाखो महिलांच्या उपस्थितीत संबोधित करताना ते बोलत होते.
जळगाव शहराजवळील विमानतळासमोरच्या इंडस्ट्रिअल पार्क येथील कार्यक्रमात व्यासपीठावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, राज्यपाल डॉ. सी.पी. राधाकृष्णन, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, केंद्रीय कृषी मंत्री शिवराजसिंह चौहान, केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव, व इतर प्रमुख नेते व अधिकारी उपस्थित होते.
मोदींनी भाषणाची सुरुवात मराठीत केली व जनतेला (सोमवारी) श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या शुभेच्छा दिल्या. देशात महिलांवरील अत्याचाराच्या अनेक घटना उघडकीस आल्याच्या पार्श्वभूमीवर मोदी म्हणाले,‘‘देशातील महिलांच्या सुरक्षेला आमचे प्रथम प्राध्यान्य असेल सर्व राजकीय पक्ष, राज्य सरकारांना मी सांगेल की, सत्ता येईल व जाईल; परंतु महिलांच्या सुरक्षेवरुन तडजोड करू नका . महाविद्यालये, रुग्णालये,कार्यालय, शाळा, अशा कोणत्याही ठिकाणी महिलांवर अत्याचाराबाबत निष्काळजीपणा आढळल्या तर त्याला सोडू नका.राज्य सरकारांसोबत नेहमीच केंद्र सरकार असेल, असा विश्वासही त्यांनी दिला.
या कार्यक्रमामध्ये ‘लखपती दीदी’ योजनेतील लाभार्थी महिलांना प्रमाणपत्रेही मोदींच्या हस्ते देण्यात आली. तसेच २५०० कोटींच्या फिरत्या निधीचे व ५ हजार कोटींची बॅंक कर्जे वितरित करण्यात आली.
ई-एफआयआर नोंदवा..
‘महिलांवरील अत्याचारांविरोधातील कायदे अत्यंत कठोर करण्यात आले आहेत.असे मोदी म्हणाले,‘ राज्य सरकारांनी या कायद्यांच्या अंमलबजावणीबाबत तडजोड करू नका . नारीशक्तीची प्रतिष्ठा जपणे हे सरकारचेच नव्हे तर समाजाचेही दायित्व (कर्तव्य) आहे. आता पीडित महिला घरबसल्या नव्या भारतीय न्यायसंहितेत ‘ई-एफआयआर’ दाखल करू शकते. त्यामुळे या तक्रारीमध्ये पोलिस ठाणे बदल करू शकत नाही.या कठोर कायद्याद्वारे दोषींना फाशी, आजन्म कारावासाच्या शिक्षेची तरतूद केली आहे.’’
मोदी उवाच…
– देशाच्या विकासात नारीशक्तीचे योगदान
– येणाऱ्या काळात देशाचा कारभार महिलांच्या हाती
– अधिकाधिक महिलांनी राजकारणात यावे
महिलांसाठी तीन लाख कोटींचे बजेट
मोदी म्हणाले,‘‘मातृशक्तीवर, त्यांच्या कर्तृत्वावर माझा विश्वास आहे. महिलानी कर्ज घेतले आणि परतही केले. आता ३० लाखांपर्यंत मुद्रा कर्जाची मर्यादा करण्यात आली आहे. २०२४ पर्यंत २५ हजार कोटीपेक्षा कमी बँक कर्ज महिलांना दिले गेले. महिलांना आर्थिकदृष्ट्या आत्मनिर्भर आणि सक्षम करण्यासाठीचे केंद्र सरकारने बजेट ३ लाख कोटींवर नेले आहे.
नेपाळ दुर्घटनेतील मृतांप्रती संवेदना..
मोदी नेपाळ येथे बस नदीत कोसळून झालेल्या दुर्घटनेबद्दल यांनी दु:ख व्यक्त केले.आपण ‘‘मृतांच्या कुटुंबीयांच्या दु:खात सहभागी आहोत. घटनेचे वृत्त कळताच रक्षा खडसेंना सूचना देऊन, सर्व व्यवस्था करण्याचे निर्देश दिले.केंद्र व राज्य सरकार मृतांसह जखमींना मदत करेल,’’ अशी ग्वाही त्यांनी दिली.
संत मुक्ताई, बहिणाबाईंचा गौरव
संत मुक्ताई,त्यांची साधना आजच्या पिढीला प्रेरणा देत आहे. ‘‘जळगाव वारकरी परंपरेचे तीर्थ आहे. संत मुक्ताईची भूमी आहे. कवयित्री बहिणाबाई चौधरींच्या कविता संसाराचे सार सांगतात. ते आजच्या समाजाला मार्गदर्शक ठरत आहेत . ,’’ असे मोदी म्हणाले. संमेलनात मोदी ३८ मिनिटे बोलले .
सखी मंडळांसाठी ६ हजार कोटी
देशभरातील लाखो सखी मंडळासाठी सहा हजार कोटींचा निधी दिला आहे. असे पंतप्रधान मोदी म्हणाले. मागील १० वर्षांमध्ये एक कोटी तर गेल्या दोन महिन्यांतच ११ लाख लखपती दीदी झाल्या. त्यांची संख्या ३ कोटींपर्यंत वाढवायची आहे. माता-भगिनींसाठी, शेतकरी व युवकांसाठी महायुती महाराष्ट्रात
नवनवीन योजना आणत असल्याचेही ते म्हणाले.
नेहमीच समाजाला महाराष्ट्रातील मातृशक्तीने दिशा देण्याचे काम केले आहे.भारताला आणखीन विकसित करायचे असेल तर महिल्यांचे योगदान असले पाहिजे. महिला शिक्षणाचा पाया रचणाऱ्या सावित्रीबाई फुलेछत्रपती शिवाजी महाराजांना घडविणाऱ्या जिजाऊसाहेब, ही त्याची उदाहरणे आहेत.
– नरेंद्र मोदी, पंतप्रधान