शासनाकडून शेतकऱ्यांसाठी पीक विम्यासाठी नवीन अट लागू, काय आहेत अटी जाणून घ्या सविस्तर ..

यंदाही राज्य शासनाने खरीप हंगामातील पिकांसाठी एक रुपयात पीकविमा भरण्याची सोय केली आहे. परंतु यासाठी शेतकऱ्यांचे बँक पासबुक व आधारकार्ड व सातबारावर एकच नाव असावे, अशी अट घालण्यात आली आहे. यावर्षी या नवीन अटीमुळे नावात काहीसा बदल असणाऱ्या शेतकऱ्यानं समोर अडचण निर्माण झाली आहे.

बळीराजाला नैसर्गिक आपत्तीतील संकटाने नुकसान झाल्यास भरपाई मिळावी, यासाठी पंतप्रधान पीकविमा योजना केंद्र सरकारच्या वतीने राबविण्यात येते. यामध्ये लाखो शेतकरी सहभागी होतात. पीकविम्याला एक रुपयांमध्ये जिल्ह्यात चांगला प्रतिसाद मिळाल्याने साडेचार लाख शेतकऱ्यांचे साडेअकरा लाख अर्ज प्राप्त झाले होते. त्यामळे साडेपाच लाख हेक्टर क्षेत्र छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील संरक्षित झाले होते.

एक जुलैपासून दरवर्षी पीकविमा भरण्यास सुरुवात होते. साधारण पीकविमा भरण्याचा कालावधी जुलै अखेरपर्यंत असतो. मात्र यावर्षी मे महिन्यात काही जिल्ह्यात पाऊस पडला तर ४ जून पासून दमदार पाऊस पडण्यास सुरुवात झाली. पाऊस लवकर सुरू झाल्याने पीकविमा भरून घेण्यास सुरुवात झाली आहे. मात्र, यावर्षी बैंक पासबुक व आधार कार्ड, सातबारा उतारावर एकच नाव असावे, ही अट घालण्यात आली आहे.

७० टक्के पिकांचे नुकसान झाल्यावर एका हेक्टरसाठी मिळणारी रक्कम (रुपयांत)

कोणतीही अडचण शेतकऱ्यांना पीकविमा भरण्यासाठी येऊ नये म्हणून नावात बदलाच्या संदर्भातील प्रस्ताव आल्यावर सर्व मंडळ अधिकारी व तलाठ्यांनी सदरील प्रस्ताव तहसील कार्यालयात न पाठवता त्यांच्या स्तरावर त्वरित निर्णय घेऊन कारवाई करण्याचे आदेश दिले आहे. तहसीलकडे व्यक्तीचे नाव, पतीचे वडिलांचे किंवा आडनाव नाव पूर्णपणे बदल असल्यास केवळ असे प्रस्ताव पाठवण्याच्या सूचना संबंधितांना दिल्या आहेत .

योजनेचा लाभ घेण्यासाठी १५ जुलैपर्यंत करता येणार अर्ज
शेतकऱ्यांना १५ जुलैपर्यंत सदरील योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज करावे लागणार आहेत. यासाठी www.pmfby.gov.in या पोर्टलवर ऑनलाइन पद्धतीने अर्ज नोंदणी सुरू असून जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी योजनेचा लाभ घेऊन विमा उतरावा असे आवाहन तालुका कृषी अधिकारी बी. जे. जायभाये यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *