Onion arrival : कांद्याची आवक घसरली, भाव स्थिरावणार आणि वाढणारही?

Onion arrival : मागील आठवड्याच्या तुलनेत या आठवडयात सुरूवातीला दोन दिवस कांदा आवक घसरलेली दिसून आली. त्यामुळे अनेक बाजारसमित्यांमध्ये घसरलेले बाजारभाव हे पुन्हा काहीसे वर येण्याची शक्यता निर्माण झाली असून या आठवड्यात आवक अशीच कमी राहिली, तर बाजारभाव स्थिरावण्याची आणि नंतर वाढण्याची शक्यता आहे.

 

सोमवारी राज्यात २ लाख ९० हजार क्विंटल कांदा आवक झाली. त्यातील नाशिक जिल्ह्यात सुमारे दीड लाख क्विंटल, पुणे जिल्ह्यात सुमारे ११ हजार क्विंटल, मुंबईमध्ये १५ हजार क्विंटल, अहिल्यानगरमध्ये ५६ हजार क्विंटल, तर सोलापूर जिल्ह्यात २६ हजार क्विंटल आवक झाली.

काल मंगळवारी मात्र या आवकेत सुमारे १ लाख क्विंटलने घट दिसून आली. त्यामुळे कांदा बाजारभाव स्थिरावल्याचे दिसून आले. नाशिक जिल्ह्यातील बाजारसमित्यांमध्ये कांदा बाजारभाव सरासरी २१०० रुपये प्रति क्विंटल, तर पुणे जिल्ह्यात सरासरी २२०० रुपये क्विंटल असे दिसून आलेत. मंगळवारी १ लाख ८२ हजार क्विंटल कांदा आवक झाली. नाशिक जिल्ह्यात एक लाख दहा हजार, सोलापूर जिल्ह्यात २० हजार, पुणे जिल्ह्यात २० हजार, नगरमध्ये १३ हजार तर मुंबईत साडेसहा हजार कांदा आवक होती.

कांदा आवक कमी राहिल्याने लासलगाव बाजारात काल कांदयाचे बाजारभाव जास्तीत जास्त २७ रुपये किलोपर्यंत पोहोचले होते. सरासरी २३ रुपये आणि कमीत कमी ८०० रुपये कांदा बाजारभाव होते. पुणे बाजारात कांदा जास्तीत जास्त २६, तर सरासरी २० रुपयांपर्यंत होता. मांजरी आणि मोशी बाजारात सरासरी २२ आणि २४ रुपये प्रति क्विंटल होता. सोलापूरला १७ रुपये, संगमनेरला १६ आणि कोपरगाव, नगरला २१ रुपये सरासरी भाव होते.02:43 PM

 
 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *