
wheat crop : कांडी धरण्याच्या अवस्थेतील गहू पिकाचे व्यवस्थापन कसे करावे यासंदर्भात महात्मा फुले राहुरी कृषी विद्यापीठातील तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले आहे.
गहू पकात कोळपणी व खुरपणी करून पिक तण विरहीत ठेवावे जेणेकरून तणांची अनद्रव्यांसाठीची स्पर्धा रोखण्यास व जमिनीत ओलावा टिकून राहण्यासाठी मदत होईल.
गहू पिकाच्या ज्या महत्त्वाच्या अवस्था आहेत त्यावेळी पकास पाणी देणे फायदेशीर ठरते. गहू पकास पेरणीनंतर ४२ ते ४५ दिवसांनी (कांडी धरण्याची वेळ) आण ६० ते ६५ दिवसांनी (पीक ओंबीवर येण्याची वेळ) पाणी द्यावे. तसेच स्थानिक परिस्थिती व जमिनीच्या खोलीनुसार पाण्याच्या दोन पाळ्यामध्ये आवशक्तेनुसार अंतर ठेवावे.
गहू पिकावरील मावा किडीच्या नियंत्रणासाठी मेटारायाझीयम अनिसोपली किंवा व्हरटीसेलीयम लेकेनी १.१५ % डब्लू.पी. ४० ग्रॅम प्रती १० लिटर पाण्यातून दोन फवारण्या १५ दिवसांच्या अंतराने कराव्यात.
तूरीसाठी व्यवस्थापन:
पक्व पिकाची काढणी करावी व सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी. तुरीच्या शेंगा वाळल्यावर यांत्रिक पद्धतीने काढणी करावी अथवा पीक कापून घ्यावे व खळ्यावर मळणी करावी. साठवणीपूर्वी धान्य ५ ते ६ दिवस उन्हात वाळवून पोत्यात साठवावे. साठवण कोंदट कवा ओलसर जागेत करू नये.