
Nanaji Deshmukh Scheme : नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाचा दुसरा टप्पा राज्यात राबवताना 21 जिल्ह्यातील 7201 गावात राबविला जाणार आहे.
दुसऱ्या टप्प्यात शेतीमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करणे, पाण्याचा कार्यक्षम वापर करणे, जमिनीचे आरोग्य सुधारण्यासाठी संवर्धित शेती पद्धतीद्वारे कृषिपूरक उद्योगांना चालना देण्यावर भर देण्याच्या सूचना कृषीमंत्र्यांनी दिल्या आहेत.
दरम्यान या प्रकल्पातील टप्पा एकमधील कामे पूर्ण झाली आहेत तर दुसऱ्या टप्प्यातील कामे सुरू होत आहेत.
कृषी उत्पादन पद्धतींची कार्यक्षमता वाढविणे, नाविन्यपूर्ण उपक्रमांमध्ये विविध संशोधन संस्थाशी समन्वय व सामंजस्य करार करणे, शेतीमध्ये डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर, क्षमता बांधणी, मनुष्यबळ व्यवस्थापन, सनियंत्रण व मूल्यमापन यावर भर देण्यात येणार आहे. त्याआधी शेतकऱ्यांना प्रकल्पातील गाव निवडीचे निकष, शेतीशाळा हा उपक्रम राज्यभरात वाढवून शेतकऱ्यांना योग्य ती माहिती देण्यात येईल.