नाशिक जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये आजपासून कांदा लिलाव बंद..

नाशिक जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये आजपासून कांदा लिलाव बंद

नाशिक जिल्ह्यातील कांदा व्यापारी असोसिएशनने आपल्या विविध मागण्यांकरिता मुख्यमंत्री आणि पणन मंत्री यांच्याशी पत्र व्यवहार करूनही मागण्या मान्य न झाल्याने आज दिनांक 20 पासून बाजार समित्या बेमुदत बंद करण्याचा निर्णय व्यापाऱ्यांनी घेतला.

सरकारच्या धोरणांचा निषेध करून आजपासून कांदा व्यापाऱ्यांनी लिलावामध्ये सहभागी न होण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे नाशिक जिल्ह्यातील सर्वच बाजार समितीमध्ये कांदा लिलाव आजपासून बेमुदत काळासाठी बंद राहणार आहेत.

ऐन गणेश उत्सवात व्यापाऱ्यांनी पुकारलेल्या या बंदमुळे जिल्ह्यातील या बाजार समितीमध्ये शुकशुकाट पाहण्यास मिळत आहे. 

 याबाबत 19 सप्टेंबर पर्यंत कुठल्याही तोडगां न निघाल्याने बाजार समित्या आज पासून बेमुदत बंदचा निर्णय घेण्यात आला आहे. शनिवारी नाशिक जिल्ह्याच्या दालनात झालेल्या बैठकीमध्ये या मागण्यांवर तोडगा निघाला नव्हता.

त्यामुळे लालसा गाव सह जिल्ह्यातील 17 बाजार समित्या बेमुदत बंद राहणार असल्याने एका दिवसात साधारणता 30 ते 40 कोटी रुपयांची उलाढाल ठप्प होणार आहे.मागील महिन्यामध्ये केंद्र सरकारने कांदा निर्यातीवर 40% शुल्क लावल्यानंतर जिल्ह्यातील सर्व कांदा व्यापाऱ्यांनी लिलाव बंद ठेवत.

 गेल्या 20 ऑगस्ट रोजी जिल्ह्यातील व्यापारी वर्गाने शेतकरी हितासाठी कांदा लिलाव बंद ठेवल्याचे सांगितले होते.  मात्र आता तब्बल एक महिन्यानंतर पुन्हा कांदा लिलाव बंद करण्याचा निर्णय व्यापारी असोसिएशनने घेतला आहे. 

ऐन  सणासुदीच्या तोंडावर आणि दुष्काळीचे सावट असताना . पुन्हा बाजार समिती बंद राहणार असल्याने कांद्याचे इतर शेतमाल उत्पादक शेतकऱ्यांची कोंडी होणार आहे. 

व्यापाऱ्यांच्या काय आहेत मागण्या?

१) बाजार समित्यांमध्ये नाफेड आणि एनसीसीएफ मार्फत खरेदी केलेला कांदा थेट बाजारात विक्री करू नये.
२) रेशन मार्फत खरेदी केलेला कांदा ग्राहकांना द्यावा.
३) ४० टक्के कांद्यावर लादलेले निर्यात शुल्क रद्द करावे.
४) संपूर्ण देशात चार टक्के आडत विक्रेत्याकडून घ्यावी.
५) सरसकट ५० टक्के सबसिडी देशांतर्गत वाहतुकीवर व्यापाऱ्यांना देण्यात यावी.
६) बाजारभाव वाढल्यानंतर चौकशी करू नये.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *