kanda bajarbhav : या बाजारात कांद्याने खाल्ला सर्वाधिक भाव; जाणून घ्या…

kanda bajarbhav: मंगळवार दिनांक २९ जानेवारी रोजी राज्यात सोमवारच्या तुलनेत आवकेत साधारणत: १ लाख क्विंटलने घट झालेली पाहायला मिळाली. त्यामुळे काही बाजारात कमाल दर वाढलेले दिसून आले.

काल राज्यात एकूण १ लाख ९० हजार क्विंटल आवक झाली. नाशिक जिल्ह्यातही आवक घटलेली दिसली. नाशिक जिल्ह्यात सोमवारच्या तुलनेत मंगळवारी अंदाजे ९५ हजार क्विंटल आवक पाहायला मिळाली.

दरम्यान लासलगावला बाजारभाव सोमवारच्या तुलनेत टिकून होते. लासलगाव बाजारात १७ हजार १४१ क्विंटल आवक झाली. कमीत कमी बाजारभाव वधारलेले दिसून आले. कमीत कमी बाजारभाव ११०० रुपये प्रति क्विंटल, तर जास्तीत जास्त बाजारभाव २६०२ रुपये प्रति क्विंटल होते. सरासरी बाजारभाव २३०० रुपये प्रति क्विंटल होते.

पुणे बाजारात सुमारे १५ हजार क्विंटल आवक होऊन सरासरी कांदा बाजारभाव १९०० रुपये प्रति क्विंटल राहिले. सोमवारच्या तुलनेत या बाजारात बाजारभाव घटलेले दिसून आले. पिंपळगाव बसवंतच्या बाजारात पोळ कांद्याची १८ हजार ९०० क्विंटल आवक झाली. कमीत कमी बाजारभाव ७०० रुपये तर जास्तीत जास्त २७५१ रुपये मिळाला. सरासरी २२०० रुपये प्रति क्विंटल असा बाजारभाव होता. सोलापूर बाजारात कांदयाचे भाव कमी झालेले दिसून आले. सोलापूरला सरासरी १७०० रुपये बाजारभाव मिळाला.

दरम्यान राज्यात वाई बाजारात लोकल वाणाच्या कांद्याची २५० क्विंटल आवक झाली. किमान दर १५०० रुपये, जास्तीत जास्त ३५०० रुपये आणि सरासरी २२०० रुपये प्रति क्विंटल मिळाला. वाई बाजारात राज्यातील सर्वाधिक कमाल दर मिळाल्याचे दिसून आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *