
अफगाणिस्तानमधून 11 मालट्रकमधून पंजाबमधील अमृतसर, जालिंदर या शहरांत कांदा दाखल झाला. केंद्र सरकारकडून कांद्याचे बाजारभाव नियंत्रणात ठेवण्यासाठी परदेशातून कांदा आयात करण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे. कांद्याने भरलेले ४५ ते ५० ट्रक भारतीय सीमेवरती उभे आहेत. त्यामुळे दोन-तीन दिवसांत भारतात मोठ्या प्रमाणात अफगाणिस्तानचा कांदा दाखल होणार आहे त्यामुळे आता महाराष्ट्रासह देशभरातील कांदा उत्पादक संतापले आहे.
केंद्राच्या वाणिज्य मंत्रालयाच्या ग्राहक संरक्षण विभागाकडून कांद्याचे बाजारभाव नियंत्रणात ठेवण्यासाठी किंमत स्थिरीकरण निधी अंतर्गत ५ लाख टन कांदा खरेदी करण्यात आला होता. त्यातील कांदा चेन्नई, दिल्ली, कोलकता, भुवनेश्वर ,मुंबई, या देशातील मेगा मेट्रोसिटीमध्ये कांदा ३० ते ३५ रुपये किलोप्रमाणे केंद्रे सुरू करून विक्री सुरू केली आहे. परंतु , केंद्र सरकारने कांद्याचे दर नियंत्रणात येत नाही म्हणून आता परदेशातून कांदा आयातीला परवानगी दिली आहे.कांद्याचे भारतीय सीमारेषेवर ४५ ते ५० ट्रक उभे आहेत. अफगाणिस्तानमधून ११ मालट्रकमधून ३०० टनहून अधिक कांदा पंजाबमधील जालिंदर ,अमृतसर, या शहरांत दाखल झाला आहे.
शेतकऱ्यांनी “दोन रुपये मिळतील, या आशेने काढलेला कांदा हा चाळीत साठविला होता. सततच्या ढगाळ वातावरणामुळे व पावसामुळे कांदा मोठ्या प्रमाणात सडत आहे. २५ ते ३० रुपयांपर्यंत कांद्याचा उत्पादन खर्च होत आहे . आज रोजी कुठेतरी शेतकऱ्यांना पाच ते दहा रुपये किलोला नफा मिळत असताना परदेशातून कांदा आयात करणे हे योग्य नाही , याचे परिणाम लोकसभेप्रमाणेच विधानसभेतही कांदा उत्पादक शेतकरी दाखविल्याशिवाय राहणार नाहीत.”
– निवृत्ती न्याहारकर, अध्यक्ष, शेतकरी बचत गट व कांदा उत्पादक
शेतकऱ्यांच्या कांद्याला कुठेतरी “अनेक महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर आता चांगला दर मिळत असताना अजूनही केंद्र सरकार कांदा निर्यातीवर २० टक्के शुल्क घेत आहे तरी अफगाणिस्तानमधून कांदा आयात करण्यास परवानगी दिली. यामुळे पंजाबमध्ये सुद्धा कांदा दाखल झाल्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. कांद्याची आयातकेंद्र सरकारने थांबवावी.
नाफेड’ व ‘एनसीसीएफ’ने खरेदी केलेला कांदा ‘नाफेड’च्या माध्यमातून “काही दिवसांपूर्वी ‘ बाजारात दाखल झाला.सरकार त्यामुळे थोड्याफार प्रमाणात बाजारभाव नियंत्रणात ठेवण्यासाठी प्रयत्न करत होते .. केंद्र सरकारने आपला कांदा असतानाही अफगाणिस्तानमधून २४ सप्टेंबरला दोन ट्रक कांदा पंजाबमधील जालंदर येथे आयात केला आहे.आपला कांदा जास्तीत जास्त निर्यात कसा होईल. शेतकऱ्यांच्या पदरी दोन पैसे अधिकचे पडतील.”चांगला बाजारभाव मिळेल याकडे सरकारने लक्ष दिले पाहिजे.
– प्रवीण कदम, कांदा निर्यातदार, लासलगाव